शिवाई प्रतिष्ठान, वृक्ष प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:14 IST2021-06-27T04:14:11+5:302021-06-27T04:14:11+5:30
लातूर शहर महापालिकेच्या वतीने जयंती साजरी लातूर : शहर महानगरपालिकेमध्ये राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. पालिकेच्या ...

शिवाई प्रतिष्ठान, वृक्ष प्रतिष्ठानतर्फे वृक्षारोपण
लातूर शहर महापालिकेच्या वतीने जयंती साजरी
लातूर : शहर महानगरपालिकेमध्ये राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. पालिकेच्या उपायुक्त मयुरा शिंदेकर यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महापालिकेचे शिक्षणाधिकारी जाधव, महेश शर्मा, एस.पी. केदार, मदने, साठे आदींसह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
स्वामी दयानंद विद्यालय जयंती साजरी
लातूर : तालुक्यातील कव्हा येथील स्वामी दयानंद विद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. उपमुख्याध्यापक देशमुख यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. देशमुख यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याबद्दल माहिती दिली.
महाराष्ट्र स्टुडेंट फेडरेशनच्या वतीन निवेदन
लातूर : व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना कागदपत्रे पूर्ततेसाठी मुदतवाढ देऊन विलंब शुल्क माफ करावे, असे निवेदन महाराष्ट्र स्टुडंट फेडरेशनच्या संघटनेच्या वतीने देण्यात आले होते. विद्यापीठ उपकेंद्र लातूर येथे संचालक डॉ. राजेश शिंदे यांना निवेदन देऊन हा अन्यायकारक निर्णय मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. या मागणीला यश मिळाले आहे. यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश जाधव, जिल्हाध्यक्ष श्याम डोंपले, नितीन हासाळे, दत्ता शिंदे, सचिन झेंटे, भीमाशंकर सुगरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
श्री केशवराज शैक्षणिक संकुलात सत्कार
लातूर :येथील श्री केशवराज शैक्षणिक संकुलात कोविड योद्धांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, सुनीताताई देशपांडे, किरणराव भावठाणकर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलूरकर, कार्यवाह नितीन शेटे, यशवंतराव देशपांडे, जितेश चापसी, आनंदराज देशपांडे, डॉ. मनोज शिरुरे धनंजय कुलकर्णी, योग सप्ताह समितीचे अध्यक्ष ॲड. जगन्नाथ चिताडे आदींची उपस्थिती होती.