संत ज्ञानेश्वर विद्यालयात वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:22 IST2021-08-23T04:22:52+5:302021-08-23T04:22:52+5:30
अहमदपूर : येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त संस्थेच्या सचिव प्राचार्य रेखाताई तरडे-हाके यांच्या हस्ते ध्वजारोहण ...

संत ज्ञानेश्वर विद्यालयात वृक्षारोपण
अहमदपूर : येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त संस्थेच्या सचिव प्राचार्य रेखाताई तरडे-हाके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष डॉ. वर्षा भोसले, कोषाध्यक्ष शीतल मालू, पालक हेमंत नळेगावकर, निर्मला नळेगावकर, मुख्याध्यापक उद्धव श्रुंगारे, मुख्याध्यापिका आशा रोडगे-तत्तापुरे, स्वप्ना हिंगणे, उकिरडे, माजी विद्यार्थिनी ॲड. अमेना शेख, ॲड. सलमान शेख उपस्थित होते. यावेळी भाषण, निबंध, गीतगायन अशा विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण गार्गी चंद्रशेखर नळेगावकर यांच्यावतीने करण्यात आले.
प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे यांनी केले. सूत्रसंचालन अश्विनी घोगरे यांनी केले तर मीना तोवर यांनी आभार मानले.
____
फोटो कॅप्शन : संत ज्ञानेश्वर विद्यालयात ७५ वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या सचिव प्राचार्य रेखाताई तरडे, मुख्याध्यापिका आशा रोडगे, मीना तोवर, अश्विनी घोगरे उपस्थित होत्या.