ग्रामविकासासाठी सूक्ष्म नियोजनासह आराखडे तयार होणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:26 IST2021-08-18T04:26:16+5:302021-08-18T04:26:16+5:30
औसा व निलंगा तालुक्यातील गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक व विविध विभागांचे अधिकारी यांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. यावेळी ते ...

ग्रामविकासासाठी सूक्ष्म नियोजनासह आराखडे तयार होणे आवश्यक
औसा व निलंगा तालुक्यातील गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक व विविध विभागांचे अधिकारी यांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत हाेते. आमदार पवार म्हणाले, औसा मतदारसंघातील हरित क्षेत्र ०.१ टक्के आहे. हे क्षेत्र अल्प असून ते वाढवण्यासाठी शंभर टक्के बांधावर, मोकळ्या जागेवर बिहार पॅटर्न, मनरेगा अंतर्गत वृक्षलागवड करण्याचे नियोजन करावे. पाठपुरावा करून मनरेगाअंतर्गतच्या सर्व २६२ कामांचा अभिसरण आराखड्यात समावेश असून, ग्रामविकास आराखड्यात अभिसरणाचा पुरेपूर वापर करावा. गोठा, शेततळे, सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पाचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावासहित आराखडे तयार करावेत. दलित वस्ती, तांडा वस्ती, आवास योजनेची कामे प्रस्तावित करावीत. २७ वैयक्तिक लाभाच्या कामांसाठी बजेट असून, त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावांसह वैयक्तिक लाभाची कामे आराखड्यात समाविष्ट करावीत. खचलेल्या, बुजलेल्या विहिरींची दुरुस्ती, खोलीकरण, रिंग बांधकामाची कामे कृती आराखड्यात प्रस्तावित करावीत. तसेच सरळ रेषेमध्ये घनवन लागवड करण्यासाठी प्रस्ताव समाविष्ट करावेत, अशा सूचनाही आमदार अभिमन्यू पवार यांनी बैठकीत केल्या. बैठकीस औशाचे गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ, निलंगा गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, उपविभागीय अभियंता जयंतराव जाधव आदींसह विविध विभागांचे अधिकारी, सरपंच उपस्थित होते.