पेट्रोल, डिझेल, खताची दरवाढ तत्काळ कमी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:20 IST2021-05-21T04:20:55+5:302021-05-21T04:20:55+5:30
कोरोनामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य आर्थिक अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने खताच्या किमती वाढविल्या आहेत. तसेच पेट्रोल, डिझेल, गॅसचे दरही ...

पेट्रोल, डिझेल, खताची दरवाढ तत्काळ कमी करावी
कोरोनामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य आर्थिक अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने खताच्या किमती वाढविल्या आहेत. तसेच पेट्रोल, डिझेल, गॅसचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे. ही दरवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पेट्रोल, डिझेल, गॅस व खताची दरवाढ कमी करावी, अशी मागणी शिरूर अनंतपाळ तालुका काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनावर शिरूर अनंतपाळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर, धामणगावचे उपसरपंच दत्तात्रय भोसले, सुधीर लखनगावे, बाळासाहेब पाटील, अमर आवाळे यांच्यासह राष्ट्रवादीचे युवक प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, तालुकाध्यक्ष विठ्ठलराव पाटील, कल्याणराव बर्गे, अब्दुल अजीज मुल्ला, नंदकुमार तांबोळकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.