शेंगदाणे, खाद्यतेलाचे दर गगनाला; भाजीपाल्यांचे दर मात्र आवाक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:17 IST2021-01-18T04:17:50+5:302021-01-18T04:17:50+5:30
लातूरच्या मंडईत भाजीपाल्यांची आवक जेमतेम आहे. परिणामी, शेवगा प्रति किलो १०० रुपयांच्या घरात आहे. तो गेल्या आठवड्यात १४० रुपयांवर ...

शेंगदाणे, खाद्यतेलाचे दर गगनाला; भाजीपाल्यांचे दर मात्र आवाक्यात
लातूरच्या मंडईत भाजीपाल्यांची आवक जेमतेम आहे. परिणामी, शेवगा प्रति किलो १०० रुपयांच्या घरात आहे. तो गेल्या आठवड्यात १४० रुपयांवर होता. हिरवी मिरची ३०, फुलगोबी ६, पत्ताकोबी ५, गाजर २०, हिरा काकडी २०, भेंडी २०, वांगे २६, कारले ३०, दोडका ३०, भोपळा १० रुपये, हिरवी काकडी २०, गवार ६०, चवळी ५०, शेवगा १००, वरणा ३०, शिमला मिरची २० रुपये, कांदे प्रति किलो ३५ रुपये, बटाटे २०, पालक १०, शेपू १५, मेथी ७ रुपये पेंढी आणि वटाणा ३० रुपये किलो दराने विकला जात आहे. किराणामध्ये साखर ३५ रुपये, रवा, मैदा ३०, पोहे ४०, दाळवं ८०, तूरडाळ, मूगडाळ ११०, चनाडाळ ७०, उडीद डाळ १२०, मसूर ८०, शाबू ६०, भगर ८० रुपये प्रति किलोने विक्री केला जात आहे.
किराणा मालामध्ये खाद्य तेलापाठोपाठ शेंगदाणे आणि डाळींचे भाव वधारले आहेत. यामध्ये तूर आणि मूगडाळ ११०, उडीद डाळ १२० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मसूरडाळ ८०, तर चनाडाळ ७० रुपये किलोने मिळत आहे. थंडीचे दिवस असल्याने सुका मेव्याचेही भाव वधारले आहेत.
गेल्या दोन आठवड्यापासून भाजीपाल्यांचे दर आवाक्यात आहेत. भावही स्थिर आहेत. अलिकडे आवकही जेमतेम होत असून, कांदा ४० वरून ३५ वर आला आहे. शिवाय, मुळा, वांगी, कारले, दोडके, वरणा, शेवगा यांचेही भाव बऱ्यापैकी आहेत. दर आवाक्यात असल्याने सामान्यांना दिलासा आहे.
किराणा मालात खाद्यतेल जैसे थे आहे. प्रति किलो १०० रुपयावरून ते थेट १५० रुपयांच्या घरात आहे. त्यापाठोपाठ उडीद डाळ आणि शेंगदाणेही महागले आहेत. तर साखर जैसे थे आहे.
- तुराब शेख,
दुकानदार