किनगावात शांतता कमिटीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:24 IST2021-09-05T04:24:23+5:302021-09-05T04:24:23+5:30

किनगाव : गणेशोत्सवासह विविध सणांच्या निमित्ताने पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची शांतता कमिटी बैठक उपविभागीय पोलीस ...

Peace Committee meeting in Kinga | किनगावात शांतता कमिटीची बैठक

किनगावात शांतता कमिटीची बैठक

किनगाव : गणेशोत्सवासह विविध सणांच्या निमित्ताने पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची शांतता कमिटी बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले यांच्या अध्यक्षतेखाली येथील पोलीस ठाण्यात शनिवारी घेण्यात आली.

गणेशोत्सवानिमित्त शासनाने लागू केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. साडेतीन फुटांपेक्षा अधिक उंचीची मूर्ती बसविण्यात येऊ नये. श्रींचे विसर्जन जागेवरच करण्यात यावे. विसर्जन मिरवणूक काढू नये, अशा सूचना गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी करण्यात आल्या.

या बैठकीला सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड, पोलीस उपनिरीक्षक आर. एस. जाधव, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र कांबळे, तलाठी हंसराज जाधव, मुरलीधर मुरकुटे, व्यंकट महाके, नागनाथ तटाळे, महेबूब सय्यद आदींसह विविध गावचे पोलीस पाटील व गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Peace Committee meeting in Kinga