वडवळ ग्रामपंचायतीवर पाटील यांचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:21 IST2021-02-11T04:21:20+5:302021-02-11T04:21:20+5:30
वडवळ नागनाथ येथील ग्रामपंचायत ही १७ सदस्यांची आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या पॅनलला ८, ...

वडवळ ग्रामपंचायतीवर पाटील यांचे वर्चस्व
वडवळ नागनाथ येथील ग्रामपंचायत ही १७ सदस्यांची आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या पॅनलला ८, तर नागनाथ बेंडके, लवटे पाटील यांच्या पॅनलला ९ जागा मिळाल्या होत्या. बुधवारी सरपंच व उपसरपंच निवडीसाठी अध्यासी अधिकारी ई. व्ही. बुवा यांच्या अध्यक्षतेखाली नूतन सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी सरपंचपदासाठी पाटील गटाकडून मुरलीधर कांबळे यांनी, तर त्यांच्या विरोधात विद्यमान जिल्हा परिषद सदस्य हर्षवर्धन कसबे यांनी अर्ज दाखल केला होता. तसेच उपसरपंच पदासाठी पाटील गटाकडून बालाजी गंदगे यांनी, तर त्यांच्या विरोधात अमित वाडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे मतदान घेण्यात आले. यात बेंडके, लवटे पाटील यांच्या गटाचा एक सदस्य फुटल्याने सरपंचपदी पाटील गटाचे मुरलीधर कांबळे, तर उपसरपंचपदी बालाजी गंदगे हे विजयी झाले. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना ग्रामविकास अधिकारी टी. एस. खाडे, तलाठी शंकरराव लांडगे यांनी सहाय्य केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.