मुंबईच्या रेल्वेफेऱ्या घटल्याने प्रवाशांना भूर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:19 IST2020-12-29T04:19:00+5:302020-12-29T04:19:00+5:30
रविवार, शुक्रवारी डोकेदुखी... लातूरहून मुंबईला जाण्यासाठी रेल्वे नसल्याने बहुतांश प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सचा आधार घेतात तर मुंबईहून परत लातूरला येण्यासाठी ...

मुंबईच्या रेल्वेफेऱ्या घटल्याने प्रवाशांना भूर्दंड
रविवार, शुक्रवारी डोकेदुखी...
लातूरहून मुंबईला जाण्यासाठी रेल्वे नसल्याने बहुतांश प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सचा आधार घेतात तर मुंबईहून परत लातूरला येण्यासाठी शुक्रवारी रेल्वे नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. याच रेल्वेला प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे दैनंदिन फेरी व्हायला हवी. लातूरहून मुंबईला जाण्यासाठी सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार चार दिवस रेल्वेसेवा सुरू आहे.
परळी-मिरज बंदच...
परळी ते मिरज धावणारी दैनंदिन रेल्वे अद्यापही सुरू झालेली नसून या मार्गावरील प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बंद असलेल्या रेल्वेगाड्या तत्काळ सुरू करून प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी.
विनोद कदम, प्रवासी
रेल्वेपेक्षा तिप्पट खर्च...
मुंबई, पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वेसाठी लागणारे तिकिटाचे दर परवडणारे आहेत. मात्र, रेल्वे दैनंदिन नसल्याने अनेक प्रवासी मुंबई, पुण्याला जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सना रेल्वेपेक्षा दुप्पट ते तिप्पट तिकीट दर देऊन प्रवास करीत आहेत.