ताेट्यातील पॅसेंजर रेल्वे हाेणार एक्सप्रेस ।
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:22 IST2021-08-26T04:22:55+5:302021-08-26T04:22:55+5:30
लातूर रेल्वे स्थानकातून सध्याला लातूर-मुंबई, बीदर-लातूर-मुंबई, लातूर-यशवंतपूर, नांदेड-पनवेल, काेल्हापूर-धनबाद, काेल्हापूर-नागपूर आणि हैदराबाद-इडपसर या सात एक्सप्रेस रेल्वे गाड्या धावत आहेत. ...

ताेट्यातील पॅसेंजर रेल्वे हाेणार एक्सप्रेस ।
लातूर रेल्वे स्थानकातून सध्याला लातूर-मुंबई, बीदर-लातूर-मुंबई, लातूर-यशवंतपूर, नांदेड-पनवेल, काेल्हापूर-धनबाद, काेल्हापूर-नागपूर आणि हैदराबाद-इडपसर या सात एक्सप्रेस रेल्वे गाड्या धावत आहेत. निजामाबाद-पंढरपूर आणि परळी वैजनाथ ते मिरज ही पॅसेंजर रेल्वे या बंद आहेत. अतिशय माेजक्या रेल्वेगाड्या लातूर येथून धावतात. बंद असलेल्या दाेन पॅसेंजर रेल्वे गाड्या पुन्हा सुरु झाल्या तर प्रवाशांची साेय हाेणार आहे.
ताेट्याची कारणे काय...
पॅसेंजर गाड्यांमध्ये फुकट्या प्रवाशांची संख्या अधिक असते. प्रवाशांची गर्दी दिसून येते मात्र अपेक्षित उत्पन्न मिळत नाही.
स्वच्छता नसल्याने फेरीवाल्यांचा त्रास नकाे म्हणून काही प्रवाशांकडून एक्सप्रेसला पसंती दिली जाते.
पॅसेंजर गाड्या निर्धारित वेळेत धावत नाहीत. प्रत्येक थांबा घेतात त्यामुळे प्रवासाला दुप्पट वेळ लागताे.
अद्याप आदेश मिळाले नाहीत...
लातूर येथून धावणाऱ्या किती रेल्वे गाड्या एक्सप्रेस हाेणार हे सध्याला सांगता येणार नाही. याबाबत आम्हाला अधिकृत आदेशही प्राप्त झाला नाही. प्रवाशांच्या साेयीसाठी रेल्व विभागात अधिक दक्ष आहे. - बिमलकुमार तिवारी, स्थानक प्रबंधक, लातूर
ग्रामीण भागातील प्रवाशांना पॅसेंजर रेल्वेचा माेठा आधार आहे. एक्सप्रेस गाड्या छाेट्या-छाेट्या थांब्यावर थांबत नाहीत. यातून प्रवाशांची गैरसाेय हाेते. यासाठी पॅसेंजर गाड्या सुरु कराव्यात, त्या गाड्यांचे रुपांतर एक्सप्रेसमध्ये करु नये. - बदाम उजळंबकर