एसटीला प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:24 IST2021-06-09T04:24:28+5:302021-06-09T04:24:28+5:30
जळगावला दोन, कोल्हापूरला ४, औरंगाबाद ४, पुणे, ४, नागपूर, १, पुसद १ अशा १५ गाड्या धावल्या असल्याचे ते म्हणाले. ...

एसटीला प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला
जळगावला दोन, कोल्हापूरला ४, औरंगाबाद ४, पुणे, ४, नागपूर, १, पुसद १ अशा १५ गाड्या धावल्या असल्याचे ते म्हणाले.
२० हजार कि.मी.चा प्रवास
एका दिवसात लातूर आगाराच्या ४२ बसेसचा २० हजार कि.मी.चा प्रवास झाला आहे. नियमामध्ये शिथिलता दिल्यानंतर बसस्थानकातही प्रवाशांची गर्दी होऊ लागली आहे. वैयक्तिक वाहन करून जाताना ई-पास लागतो. परंतु, बसद्वारे गेल्यानंतर ई-पासची गरज नाही. त्यामुळे जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी प्रवासी एसटीला पसंती देत आहेत. यावरून हे दिसत आहे.
पुणे मार्गावर प्रवाशांची गर्दी
तीन दिवसांपूर्वी लातूर आगारातून सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तीन बसेस पुणेसाठी सोडण्यात आल्या. या बसेसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रविवारपर्यंत ५० टक्के क्षमतेवर परवानगी होती. आता शंभर टक्के क्षमतेने परवानगी मिळाल्याने एका वेळेला ३० ते ३५ प्रवासी जागेवरून मिळत आहेत. - जाफर कुरेशी, आगार व्यवस्थापक, लातूर
रुग्णसंख्या घटत असल्यामुळे प्रवासी कोरोना नियमांचे पालन करून प्रवास करीत आहेत. मास्क, सॅनिटायझरचा वापर करीत आहेत. एसटी वाहकांकडून मास्क घातल्याशिवाय एसटीमध्ये प्रवेश दिला जात नाही. शिवाय, प्रवासीही ज्या सीटवर बसतात, त्यावर स्वत: सॅनिटायझर फवारणी करून घेत आहेत. असे अनुपालन केले जात असल्याने रुग्णसंख्या आटोक्यात येईल. संसर्ग टळेल, असा विश्वास आगार व्यवस्थापकांनी व्यक्त केला.