राज्य कृषी मूल्य आयोग अध्यक्षपदी पाशा पटेल यांची दुसऱ्यांदा निवड

By हरी मोकाशे | Updated: October 18, 2023 19:24 IST2023-10-18T19:24:35+5:302023-10-18T19:24:51+5:30

माजी आ. पाशा पटेल हे यापूर्वीही महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष राहिले आहेत.

Pasha Patel elected for the second term as State Agricultural Value Commission Chairman | राज्य कृषी मूल्य आयोग अध्यक्षपदी पाशा पटेल यांची दुसऱ्यांदा निवड

राज्य कृषी मूल्य आयोग अध्यक्षपदी पाशा पटेल यांची दुसऱ्यांदा निवड

लातूर : महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी माजी आ. पाशा पटेल यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे स्वागत होत आहे.

माजी आ. पाशा पटेल हे यापूर्वीही महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात खाद्यतेल व डाळींच्या बाजारभावामध्ये वाढ होण्यासाठी आयात- निर्यात धोरणात आवश्यक बदल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, तत्कालिन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या निदर्शनास आणून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. आ

ता पुन्हा माजी आ. पटेल यांची निवड झाली आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी विशेष सहाय्य केले. तसेच कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनीही पाठपुरावा करून नियुक्तीसाठी प्रयत्न केले. या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Pasha Patel elected for the second term as State Agricultural Value Commission Chairman