मौर्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये पालक मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST2021-07-20T04:15:33+5:302021-07-20T04:15:33+5:30
अहमदपूर : येथील सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये पालक मेळावा घेण्यात आला. यावेळी श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ...

मौर्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये पालक मेळावा
अहमदपूर : येथील सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये पालक मेळावा घेण्यात आला. यावेळी श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, संस्था सचिव, प्राचार्य रेखाताई तरडे, हेमंत गुट्टे, सुरेश हाके पाटील, प्राचार्य नितीन शिवपुजे, परमेश्वर पाटील, लक्ष्मण पाटील, धोंडिराम पौळ, बालाजी पारेकर, अजय भालेराव, रोडगे उपस्थित होते. यावेळी गणेश हाके म्हणाले, औपचारिक शिक्षणावर अधिक भर दिला जातो. त्यामुळे शिक्षण उपचाराचा भाग बनत चालले आहे. शिक्षण केवळ उपचार न राहता तो विद्यार्थ्यांच्या जीवनशैलीचा भाग बनला पाहिजे. स्कूलचे संचालक कुलदीप हाके यांनी मनोगत व्यक्त केले. पालक माधव वारलवाड यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्यांनी केले. संचालिका प्रा. शिवालिका हाके यांनी आभार मानले.