शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आईवडिल,अपंग बहिणीला मोठ्या भावाने छळले; संतापलेल्या लहान्याने त्याला गोळी झाडून संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 20:24 IST

कुटुंबीयांना छळणाऱ्या सूरजवर सख्ख्या भावानेच झाडली गाेळी!

लातूर : एका तरुणाची डाेक्यात गाेळी झाडून हत्या केल्याची घटना मंगळवारी भातखेडा (ता. लातूर) येथे समाेर आली. दरम्यान, या हत्येचा लातूर ग्रामीण पाेलिसांनी उलगडा केला. कुटुंबीयांना सतत छळणाऱ्या सूरजवर सख्ख्या भावानेच गाेळी झाडली असून, पाेलिसांनी त्यास अटक केली आहे. लातूरच्या न्यायालयात त्याला हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली.

पाेलिसांनी सांगितले, दारूच्या आहारी गेलेला माेठा भाऊ आणि घरात आजारी वडील, आई, अपंग बहिणीला मानसिक-शारीरिक त्रास देत असल्याने वैतागलेल्या लहान भावानेच माेठ्या भावाच्या डाेक्यात गाेळी झाडून त्याची हत्या केली. याप्रकरणी मयत तरुणाच्या लहान भावाला पाेलिसांनी अटक केली. गाेविंद रामकृष्ण मुळे (वय ५१) हे भातखेडा वास्तव्याला आहे. त्यांना पत्नी, अपंग मुलगी, माेठा मुलगा सूरज आणि लहान मुलगा धीरज असा परिवार आहे. सूरज हा मजुरी करत असे. शिवाय, ताे दारूच्या आहारी गेला हाेता. सतत दारू पिऊन घरातील बहीण, आई, भावाला छळत हाेता. या छळाला कंटाळून लहान भाऊ धीरज हा आई आणि बहिणीला साेबत घेऊन पुण्याला राेजगारासाठी गेला. परिणामी, भातखेडा येथे गाेविंद मुळे आणि मुलगा सूरज हे दाेघेच राहत हाेते.

शवविच्छेदन अहवालातून गाेळी झाल्याचे झाले उघड...साेमवारी रात्री घरात वडील आणि मुलगा झाेपल्यानंतर रात्री १०.३० ते सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास त्याच्या डाेक्यात गाेळी झाडून हत्या केल्याची घटना समाेर आली. याबाबत गाेविंद मुळे यांच्या तक्रारीवरून प्रारंभी आकस्मात मृत्यूची नाेंद केली हाेती. मात्र, शवविच्छेदन अहवालात सूरज याच्या डाेक्यात बंदुकीची गाेळी आढळून आली. त्यानंतर अज्ञाताविराेधात खुनाचा गुन्हा दाखल केला.

पाेलिसी खाक्या दाखवताच भावाने दिली गुन्ह्याची कबुली...प्रारंभी पाेलिसांनी दाेघांवर संशय व्यक्त केला हाेता. यातील लहान भाऊ धीरजला ताब्यात घेत त्याच्याकडे अधिक चाैकशी केली. पाेलिसी खाक्या दाखवताच त्याने गाेळी झाडल्याची कबुली दिली. लातूरच्या न्यायालयात त्याला हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली. तपास पाे.नि. दीपककुमार वाघमारे करत आहेत.

पुण्यातून राताेरात आला आणि भावाचा गेम केला?सुरजच्या छळाला कंटाळलेल्या लहान भावाने त्याची हत्या करण्यासाठी पुण्यात पिस्तूल खरेदी केली. साेमवारी रात्री ताे भातखेडा गावात आला आणि झाेपेत असलेल्या सूरजचा गेम केला. त्यानंतर ताे राताेरात पुण्यात पाेहचला, अशी माहिती पाेलिसांच्या चाैकशीत समाेर आली आहे. तर त्याने काेणाकडून पिस्तूल खरेदी केले, याचाही तपास पाेलिस करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूlaturलातूर