गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन जनरेटर मशीन सुविधा मोफत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:36 IST2020-12-15T04:36:05+5:302020-12-15T04:36:05+5:30
संपूर्ण जगात कोरोनाचे संकट कायम आहे. कोरोनाबाधितांच्या शरीरातील ऑक्सिजन लवकर कमी होते. अशा परिस्थितीत ऑक्सिजन जनरेटर मशीनमुळे रुग्णांना ऑक्सिजनची ...

गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन जनरेटर मशीन सुविधा मोफत
संपूर्ण जगात कोरोनाचे संकट कायम आहे. कोरोनाबाधितांच्या शरीरातील ऑक्सिजन लवकर कमी होते. अशा परिस्थितीत ऑक्सिजन जनरेटर मशीनमुळे रुग्णांना ऑक्सिजनची उपलब्धता होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे रुग्णांना घरातच आराम घेता येणार आहे. त्यासाठी गरजूंनी उदगिरातील बसस्थानकासमोरील गिरी कॉम्प्लेक्स येथे संपर्क करावा, असे आवाहन रोटरीतर्फे करण्यात आले आहे.
गरजूंनी डॉक्टरांचे पत्र, आधारकार्ड, ओळखपत्राची पूर्तता करुन ही मशीन घरी घेऊन गरजूंना ऑक्सिजन उपलब्ध करुन देऊ शकतात. त्यानंतर ती मशीन सुस्थितीत रोटरी क्लब उदगीर सेंट्रलला परत करावयाची आहे. जेणेकरून अन्य गरजूंची मदत होईल, असे रोटरी फाऊंडेशनचे विजयकुमार पारसेवार यांनी सांगितले. यावेळी रोटरी अध्यक्ष विशाल तोंडचीरकर, सचिव कीर्ती कांबळे, उपाध्यक्ष प्रशांत मांगुळकर, प्राचार्य व्यंकट कणसे, चंद्रकांत ममदापुरे, भागवत केंद्रे, विशाल जैन, मंगला विश्वनाथे, ज्योती डोळे आदींची उपस्थिती होती.