अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात ३० खाटांना ऑक्सिजनची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:34 IST2020-12-13T04:34:25+5:302020-12-13T04:34:25+5:30

अहमदपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विभागाने येथील ग्रामीण रुग्णालयात ३० खाटांना ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे ऑक्सिजन लागणा-या ...

Oxygen facility for 30 beds in Ahmedpur Rural Hospital | अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात ३० खाटांना ऑक्सिजनची सुविधा

अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात ३० खाटांना ऑक्सिजनची सुविधा

अहमदपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विभागाने येथील ग्रामीण रुग्णालयात ३० खाटांना ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे ऑक्सिजन लागणा-या रुग्णांना उदगीर अथवा लातूरला जाण्याची समस्या दूर झाली आहे. या सेवेमुळे येथील ग्रामीण रुग्णालयातून आणखीन आरोग्य सेवा अधिक दर्जेदार मिळणार आहे.

अहमदपूर येथे ग्रामीण रुग्णालय असून परिसरातील व तालुक्यातील रुग्ण येथे उपचारासाठी दाखल होतात. लातूर- नांदेड मार्गावर अहमदपूर असल्याने सतत वाहनांची वर्दळ असते. त्याचबरोबर या भागात अपघाताचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे अपघातातील जखमींना काहीवेळेस ऑक्सिजनची आवश्यकता भासत होते. तेव्हा सदरील जखमींना प्रथमोचार करुन लातूरला हलवावे लागत होते. त्यामुळे काही वेळेस रुग्णांना वेळेवर लातूरला पोहोचणे कठीण होत असे. ऑक्सिजनअभावी फुफ्फुसावर परिणाम होऊन श्वास घेण्यास अडचणी येऊन रुग्ण दगावण्याची भीती असते.

दरम्यान, काेरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने आरोग्य यंत्रणा सक्षमीकरणावर भर दिला आहे. त्याअंतर्गत येथील ग्रामीण रुग्णालयातील ३० खाटांना ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या सुविधेमुळे

रुग्णांची सोय होणार आहे. ग्रामीण रुग्णालयात सध्या २७८ क्यूबिक मीटर ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यात २६ छोटे आणि ३६ जम्बो सिलेंडर आहेत. दरम्यान, या सुविधेची पाहणी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय बिरादार, डॉ. जयप्रकाश केंद्रे, डॉ. शिवाजी सुरजमल, डॉ. नाथराव केंद्रे यांनी केली.

रुग्णांची गैरसोय दूर...

या सुविधेमुळे रुग्णालयात येणा-या रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे. नागरिकांनी घशामध्ये खवखव होणे, कोरडा खोकला, तीव्र ताप व श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे जाणवू लागल्यानंतर तात्काळ उपचार घ्यावेत. ग्रामीण रुग्णालयात ३० खाटा ऑक्सिजनयुक्त करण्यात आल्या आहेत. सध्या काेरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मास्क, फिजिकल डिस्टन्स राखावा.

- डॉ. दत्तात्रय बिरादार, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, अहमदपूर.

Web Title: Oxygen facility for 30 beds in Ahmedpur Rural Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.