शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

वयाची शंभरी पार, कोरोना हद्दपार; वयोवृद्ध चव्हाण दाम्पत्य ठणठणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 5:39 AM

वयोवृद्ध चव्हाण दाम्पत्य ठणठणीत

लातूर : काटगाव तांड्याचे १०५ वर्षीय धेनू उमाजी चव्हाण आणि ९५ वर्षीय त्यांच्या पत्नी मोताबाई चव्हाण यांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार घेऊन ७ दिवसांत कोरोनावर मात केली. शंभरीपार केलेल्या चव्हाण यांनी कोरोना हद्दपार करुन सर्वांनाच घाबरू नका, धीराने सामोरे जा असा सल्ला दिला आहे.

कोरोना झाला म्हटले की, अनेकांचा आत्मविश्वास कमी होतो. परंतु, लक्षणे दिसली की तातडीने तपासणी आणि बाधा झाल्याचे कळले की तत्पर इलाज वरदान ठरतो. या दाम्पत्याला लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

मुलगा सुरेश चव्हाण शंभरी गाठलेल्या आई-वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे चिंतित झाले होते. मात्र, धेनू व त्यांच्या पत्नी मोताबाई यांनी मुलाला सांगितले की, आम्ही बरे होऊन घरी येऊ. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, डॉ. शैलेंद्र चव्हाण, डॉ. गजानन हलकांचे, डॉ. धर्माधिकारी यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर  व कर्मचाऱ्यांनी चव्हाण दाम्पत्याची काळजी घेतली. सात दिवसांत ते बरे होऊन घरी परतले. 

धेनू चव्हाण चव्हाण यांचा  मुलगा सुरेश म्हणाले, अधिक वय असल्याने चिंता होती. सर्व डॉक्टरांनी प्रयत्न केले. पालकमंत्री अमित देशमुख यांनी उपचारासाठी सूचना दिल्या. तसेच ज्यांनी-ज्यांनी आधार दिला त्या सर्वांना व डॉक्टरांना विसरू शकणार नाही.

शंभरीच्या उंबरठ्यावरील आजोबांचा चिवटपणाकरमाळा (जि. सोलापूर) : वय वर्षे ९८... तरीही तंदुरुस्त... अन्‌ धडधाकट. पण, अवचित क्षणी या आजोबांना कोरोनानं गाठलं. पण, ते डगमगले नाही. जगण्याची जबरदस्त आकांक्षा आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतेही रेमडेसिविर अथवा ऑक्सिजनचा टेकू न घेता त्यांनी कोरोनावर मात केली. शेटफळचे प्रल्हाद रामचंद्र पोळ त्यांचं नाव.

प्रल्हाद पोळ यांना लहानपणापासून व्यायामाची व वाचनाची आवड आहे. आजही ते नियमितपणे दररोज व्यायाम करतात. या वयातही त्यांना कोणताही आजार नाही. चष्म्याशिवाय पुस्तक व वर्तमानपत्रे वाचू शकतात. सर्व दातही अगदी मजबूत असल्याने स्वतः ऊस सोलून खातात. शेतातील किरकोळ कामे व गुरे सांभाळतात.शेतातील घरापासून दररोज नित्यनियमाने चालत गावात येऊन देवदर्शन करतात. चाचणी पॉझिटिव्ह आली, घरच्या सर्वांना त्यांची काळजी वाटू लागली होती. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याlaturलातूर