वयाची शंभरी पार, कोरोना हद्दपार; वयोवृद्ध चव्हाण दाम्पत्य ठणठणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 05:39 AM2021-04-29T05:39:46+5:302021-04-29T05:40:06+5:30

वयोवृद्ध चव्हाण दाम्पत्य ठणठणीत

Over a hundred years of age; Corona deported! | वयाची शंभरी पार, कोरोना हद्दपार; वयोवृद्ध चव्हाण दाम्पत्य ठणठणीत

वयाची शंभरी पार, कोरोना हद्दपार; वयोवृद्ध चव्हाण दाम्पत्य ठणठणीत

Next

लातूर : काटगाव तांड्याचे १०५ वर्षीय धेनू उमाजी चव्हाण आणि ९५ वर्षीय त्यांच्या पत्नी मोताबाई चव्हाण यांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार घेऊन ७ दिवसांत कोरोनावर मात केली. शंभरीपार केलेल्या चव्हाण यांनी कोरोना हद्दपार करुन सर्वांनाच घाबरू नका, धीराने सामोरे जा असा सल्ला दिला आहे.

कोरोना झाला म्हटले की, अनेकांचा आत्मविश्वास कमी होतो. परंतु, लक्षणे दिसली की तातडीने तपासणी आणि बाधा झाल्याचे कळले की तत्पर इलाज वरदान ठरतो. या दाम्पत्याला लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

मुलगा सुरेश चव्हाण शंभरी गाठलेल्या आई-वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे चिंतित झाले होते. मात्र, धेनू व त्यांच्या पत्नी मोताबाई यांनी मुलाला सांगितले की, आम्ही बरे होऊन घरी येऊ. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, डॉ. शैलेंद्र चव्हाण, डॉ. गजानन हलकांचे, डॉ. धर्माधिकारी यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर  व कर्मचाऱ्यांनी चव्हाण दाम्पत्याची काळजी घेतली. सात दिवसांत ते बरे होऊन घरी परतले. 

धेनू चव्हाण चव्हाण यांचा  मुलगा सुरेश म्हणाले, अधिक वय असल्याने चिंता होती. सर्व डॉक्टरांनी प्रयत्न केले. पालकमंत्री अमित 
देशमुख यांनी उपचारासाठी सूचना दिल्या. तसेच ज्यांनी-ज्यांनी आधार दिला त्या सर्वांना व डॉक्टरांना विसरू शकणार नाही.

शंभरीच्या उंबरठ्यावरील आजोबांचा चिवटपणा

करमाळा (जि. सोलापूर) : वय वर्षे ९८... तरीही तंदुरुस्त... अन्‌ धडधाकट. पण, अवचित क्षणी या आजोबांना कोरोनानं गाठलं. पण, ते डगमगले नाही. जगण्याची जबरदस्त आकांक्षा आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कोणतेही रेमडेसिविर अथवा ऑक्सिजनचा टेकू न घेता त्यांनी कोरोनावर मात केली. शेटफळचे प्रल्हाद रामचंद्र पोळ त्यांचं नाव.

प्रल्हाद पोळ यांना लहानपणापासून व्यायामाची व वाचनाची आवड आहे. आजही ते नियमितपणे दररोज व्यायाम करतात. या वयातही त्यांना कोणताही आजार नाही. चष्म्याशिवाय पुस्तक व वर्तमानपत्रे वाचू शकतात. सर्व दातही अगदी मजबूत असल्याने स्वतः ऊस सोलून खातात. शेतातील किरकोळ कामे व गुरे सांभाळतात.शेतातील घरापासून दररोज नित्यनियमाने चालत गावात येऊन देवदर्शन करतात. चाचणी पॉझिटिव्ह आली, घरच्या सर्वांना त्यांची काळजी वाटू लागली होती. 

Web Title: Over a hundred years of age; Corona deported!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.