करप्याचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतातुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:36 IST2020-12-12T04:36:22+5:302020-12-12T04:36:22+5:30
... नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा कायम देवणी : तालुक्यातील काही शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील सोयाबीन उगवले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांनी ...

करप्याचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतातुर
...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा कायम
देवणी : तालुक्यातील काही शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील सोयाबीन उगवले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार पंचनामे करण्यात आले. त्यातील काही शेतकऱ्यांना रोख, बियाणे भरपाई म्हणून मिळाली; परंतु अद्यापही काही शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सदरील शेतकऱ्यांचे कृषी विभागाकडे खेटे सुरू आहेत.
...
खड्डेमय रस्त्यामुळे दुचाकीस्वार हैराण
किल्लारी : किल्लारी परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अनेकदा अपघात होत आहेत. यंदा अतिपाऊस झाल्याने खड्ड्यांचे आकार वाढले आहेत. त्यामुळे खाजगी वाहनधारक प्रवासी घेऊन जाण्यास धजावत नाहीत. या भागातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी सातत्याने मागणी होऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
...
वीजपुरवठा खंडित, शेतकऱ्यांतून संताप
किनगाव : महावितरणच्या वतीने सध्या भारनियमन करण्यात येत आहे. याशिवाय, सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे शेतातील विद्युत मोटारी जळण्याचे प्रमाण वाढले आहे, तसेच शेतीसाठी रात्री वीजपुरवठा करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत आहे. अनेकदा विहिरीत पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांची घालमेल होत आहे. महावितरणने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.