रिमझिम पावसामुळे पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:27 IST2021-09-10T04:27:03+5:302021-09-10T04:27:03+5:30

यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम, कृषी महाविद्यालयाचे विस्तार कृषी विद्यावेत्ता अरुण गुट्टे, प्राचार्य अंगद सूर्यवंशी यांनी सोयाबीन पिकावरील ...

Outbreaks appear to be exacerbated during the monsoon season | रिमझिम पावसामुळे पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव

रिमझिम पावसामुळे पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव

यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम, कृषी महाविद्यालयाचे विस्तार कृषी विद्यावेत्ता अरुण गुट्टे, प्राचार्य अंगद सूर्यवंशी यांनी सोयाबीन पिकावरील रोगाची पाहणी करून सोयाबीन पिवळे पडण्यामागील कारणे शेतकऱ्यांना सांगितली. ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे पिकावर बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यात सुरुवातीला सोयाबीनची खालची पाने पिवळी पडतात. त्यानंतर सर्व पाने पिवळी पडून शेंगा व खोडावर खोलगट काळे चट्टे पडतात, असे सांगितले.

या रोगाच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोन्याझोल आणि सल्फर २० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी अथवा टेब्युकोन्याझोल २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावे. गरजेनुसार १०-२० मिली स्टिकरचा वापर करावा. फवारणी करताना इतर बुरशीजन्य, कीटकनाशक व खतांचा एकत्रित वापर करू नये, असेही ते म्हणाले.

पुढील हंगामात या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पिकांची फेरपालट करावी. पिकांमध्ये हवा खेळती राहून आर्द्रता कमी करण्यासाठी बीबीएफ पध्दतीने पेरणी करावी. पेरणीपूर्वी बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया व पेरणीनंतर ४०-४५ दिवसानंतर एका बुरशीनाशकाची फवारणी करावी.

यावेळी पानगावच्या मंडळ कृषी अधिकारी प्रमिला जंजिरे, कृषी पर्यवेक्षक अंगद सुडे, कृषी सहायक रमेश आलापुरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Outbreaks appear to be exacerbated during the monsoon season