वाढवण्यात नवख्या चेहऱ्यांना संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:20 IST2021-01-20T04:20:43+5:302021-01-20T04:20:43+5:30
वाढवणा बु. येथील ग्रामपंचायत १७ सदस्यांची आहे. या निवडणुकीत माजी पं.स. सदस्य दत्ता बामणे, नागेश थोंटे, नागोराव आमगे, सुभाष ...

वाढवण्यात नवख्या चेहऱ्यांना संधी
वाढवणा बु. येथील ग्रामपंचायत १७ सदस्यांची आहे. या निवडणुकीत माजी पं.स. सदस्य दत्ता बामणे, नागेश थोंटे, नागोराव आमगे, सुभाष कांबळे, मनियार हसिनाबी, तोंडारे सयदबी, पठाण अमजद, ज्ञानेश्वर क्षीरसागर, सुनीता खिडसे, विजयमाला केसगीरे, उषा काळे यांना पहिल्यांदा संधी मिळाली आहे. तसेच माजी सरपंच सविता बामणे, माजी उपसरपंच संगम अष्टुरे, महानंदा जाधव, सुनीता भांगे, अनंत पारसेवार, अमृता केसगीरे हे दुसऱ्यांदा विजयी झाले आहे.
अटीतटीच्या लढतीत माजी पंचायत समिती सभापती सुनीता हाळे यांचा विजयमाला केसगीरे यांनी पराभव केला. माजी सरपंच उत्तम गायकवाड यांचा सुभाष कांबळे यांनी तर माजी सरपंच शिवकुमार हाळे यांचा पराभव नागेश थोंटे यांनी केला आहे. माजी पंचायत समिती सदस्य दत्ता बामणे, चेअरमन विश्वनाथ काळे, पंचायत समिती सदस्य माधव कांबळे यांच्या पॅनलचे ९ सदस्य निवडून आलेले आहे.