ई-पाससाठी दोनच कारणे, एक नातेवाईकाचा मृत्यू, दूसरे रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:31 IST2021-05-05T04:31:46+5:302021-05-05T04:31:46+5:30
ई-पाससाठी आवश्यक कागदपत्रे जोडावीत... ई-पाससाठी पोलीस प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या संकेतस्थळावर दररोज मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहेत. मात्र, बहुतांश अर्जदार ...

ई-पाससाठी दोनच कारणे, एक नातेवाईकाचा मृत्यू, दूसरे रुग्णालय
ई-पाससाठी आवश्यक कागदपत्रे जोडावीत...
ई-पाससाठी पोलीस प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या संकेतस्थळावर दररोज मोठ्या प्रमाणात अर्ज येत आहेत. मात्र, बहुतांश अर्जदार केवळ माहिती भरून अर्ज सबमिट करतात. त्यासाठी अत्यावश्यक कारण काय आहे, हे नमूद करीत नाही. तसेच अर्जासोबत आवश्यक असलेली कागदपत्रेही अपलोड करीत नाहीत. त्यामुळे अशा पासला मंजुरी दिली जात नाही. नागरिकांनी प्रवासाचे कारण योग्य दिले व आवश्यक ती कागदपत्रे अपलोड केल्यास पोलीस प्रशासनाच्या वतीने परवानगी दिली जाते.
असा करावा अर्ज...
पोलीस प्रशासन किंवा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या वेबसाईटवर जाऊन स्वत:ची माहीती, फोटो व ज्या कामासाठी प्रवास करायचा आहे त्या कामाच्या संदर्भातील कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. माहिती अपलोड केल्यानंतर अर्जदारास सांकेतिक क्रमांक प्राप्त होतो. तो सांकेतिक क्रमांक पुन्हा वेबसाईटवर टाकल्यास हा ई-पास परवानगी दिली असेल तर डाऊनलोड करून घेता येतो.
पास देण्याची प्रक्रिया गतिमान...
प्राप्त झालेल्या अर्जांमधून प्रवासाची कारणे तपासून परवानगी दिली जाते. अत्यावश्यक असेल तर सदरील अर्ज तात्काळ निकाली काढला जातो. जिल्ह्यात ई-पास देण्याची प्रक्रिया गतिमान असून, आातपर्यंत २,१०८ अर्जांना परवानगी देण्यात आली असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी सांगितले.
जिल्ह्यात आतापर्यंत मंजूर झालेले अर्ज - २,१०८
जिल्ह्यात आतापर्यंत नामंजूर झालेले अर्ज - ५,३६५
जिल्ह्यात प्रलंबित असलेले अर्ज - ११७