माहिती दिलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार विमा; औसा तालुक्यातील हजाराे शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:21 IST2021-02-09T04:21:54+5:302021-02-09T04:21:54+5:30
यंदाच्या खरीप हंगामात बेलकुंडसह परिसरातील बहुतांश गावांमध्ये अतिवृष्टीमुळे काढणीअगोदर व काढणीपश्चात सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यावेळी ...

माहिती दिलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार विमा; औसा तालुक्यातील हजाराे शेतकरी अडचणीत
यंदाच्या खरीप हंगामात बेलकुंडसह परिसरातील बहुतांश गावांमध्ये अतिवृष्टीमुळे काढणीअगोदर व काढणीपश्चात सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यावेळी तालुक्यातील फक्त १४ हजार पाचशे शेतकऱ्यांचे ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने नुकसानीचे अर्ज स्वीकारण्यात आले, तर एकूण १० हजार अर्ज शेतकऱ्यांनी अज्ञानापोटी काही चुकीचे शब्द लिहिल्याने कंपनीकडून बाद ठरवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने दिली आहे. नुकसानीची माहिती देणाऱ्या शेतकऱ्यांनाच विमा परतावा मिळणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. यापैकी येथील काही शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याचे पैसे जमा होण्यास प्रारंभ झाला आहे. जे शेतकरी विमा कंपनीला नुकसानीची माहिती देऊ शकले नाहीत, असे शेतकरी विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. कृषी आयुक्तांनी कंपनीला शासकीय यंत्रणांनी केलेले नुकसानीचे पंचनामे ग्राह्य धरून विमा परतावा द्यावा, असा आदेश दिला आहे. असे असतानाही या आदेशाला संबंधित कंपनीने केराची टोपली दाखवली आहे.
विमा कंपनीकडून नियमांची जनजागृती आवश्यक
७२ तासांच्या आत नुकसानीची माहिती देणे बंधनकारक असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे, तर तांत्रिक बाबतीत शेतकऱ्यांना प्रबाेधन करण्याची गरज आहे.