ऊर्जा ऑडिट विषयावर ऑनलाईन कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:20 IST2021-05-09T04:20:27+5:302021-05-09T04:20:27+5:30

शासकीय रुग्णालय परिसरात मोफत भोजन उपक्रम लातूर : शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था येथे ग्रामीण भागातील उपचार ...

Online workshop on energy audit | ऊर्जा ऑडिट विषयावर ऑनलाईन कार्यशाळा

ऊर्जा ऑडिट विषयावर ऑनलाईन कार्यशाळा

शासकीय रुग्णालय परिसरात मोफत भोजन उपक्रम

लातूर : शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था येथे ग्रामीण भागातील उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. संचारबंदीमुळे नातेवाइकांकडे जाता येत नसल्याने नातेवाइकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. त्यामुळे शहरातील विविध सामाजिक संस्थाच्या वतीने सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात मोफत भोजनाचा उपक्रम राबविला जात आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची गैरसोय दूर होण्यास मदत झाली आहे.

दुभाजकामध्ये कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले

लातूर : शहरातील मुख्य रस्त्यावरील दुभाजकामध्ये कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अनेक व्यावसायिक तसेच नागरिक नियमित घंटागाडी येत नसल्याने दुभाजकामध्ये कचरा टाकत आहेत. दरम्यान, वाऱ्यामुळे दुभाजकातील कचरा रस्त्यावर उडत असल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याकडे महापालिकेच्या स्वच्छता विभागाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांसह वाहनधारकांतून होत आहे.

वादळी वारा आणि पावसामुळे नुकसान

लातूर : जिल्ह्यात शुक्रवारी वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निलंगा, उदगीर, औसा, शिरुर अनंतपाळ, देवणी, जळकोट, अहमदपूर, रेणापूर आदी भागात वादळी वारा होता. उदगीर, निलंगा आणि जळकाेट तालुक्यात वादळी वारा तसेच विजांचा कडकडाट झाला. काही ठिकाणी विजा पडल्याने जनावरांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत करावी, अशी मागणी होत आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने चाचण्यांवर भर

लातूर : शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने आरोग्य विभागाच्या वतीने बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन तपासणी केली जात आहे. तसेच गृहविलगीकरणातील रुग्णांवर वॉच ठेवला जात असून, स्वतंत्र नियमावली जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, मास्क, फिजिकल डिस्टन्स आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने केले जात आहे.

Web Title: Online workshop on energy audit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.