एसटीचे ऑनलाईन बुकिंग अनेक प्रवाशांना ठाऊकच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:24 IST2021-08-24T04:24:59+5:302021-08-24T04:24:59+5:30
आम्हाला ठाऊकच नाही... महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्यावतीने रेल्वेच्या धर्तीवर गत दहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेली ऑनलाईन सेवा अद्यापही ...

एसटीचे ऑनलाईन बुकिंग अनेक प्रवाशांना ठाऊकच नाही!
आम्हाला ठाऊकच नाही...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्यावतीने रेल्वेच्या धर्तीवर गत दहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेली ऑनलाईन सेवा अद्यापही ग्रामीण भागातील प्रवाशांपर्यंत पाेहोचलेली नाही. अनेक प्रवाशांकडे स्मार्ट फाेन नाहीत. गावपातळीवर कॅफे सेंटर, नेटवर्किंगचा अभाव असताे. अशावेळी आम्ही हैदराबाद, मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद येथे जाण्यासाठी ट्रॅव्हल्सचा वापर करताे.
- अंगद किनीकर, उदगीर
एस. टी. महामंडळाच्या ऑनलाईन बुकिंग सेवेचा शहरी भागात प्रवासी लाभ घेतात. घरबसल्या ऑनलाईन तिकीट बुकिंग करतात. मात्र, ग्रामीण भागातील प्रवाशांना ही सुविधा वापरताना अडचणीचे वाटते. अशावेळी थेट प्रवासादरम्यान तिकीट काढणे प्रवाशांना अधिक साेयीचे वाटते. बहुतांश प्रवाशांना ही सेवाच माहिती नाही.
- बाळासाहेब हाळदे, लातूर
असे करावे ऑनलाईन बुकिंग...
महामंडळाने सुरू केलेल्या ऑनलाईन बुकिंग सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना गुगलवर जावे लागणार आहे. त्यानंतर एमएसआरटीसी माेबाईल रिझर्व्हेशन ॲप डाऊनलाेड करावा लागणार आहे. या ॲपमध्ये दिलेल्या सूचनेनुसार माहिती भरुन ते डाऊनलाेड केल्यानंतर रिझर्व्हेशन सक्सेस म्हणून मेसेज येताे. त्यावेळी आपले आरक्षणाची नाेंदणी झाल्याचा मेसेज प्रवाशांच्या माेबाईलवर येताे.
लातुरात प्रतिसाद...
लातूर येथील मध्यवर्ती बसस्थानकात ऑनलाईन खिडकीवर तिकीट बुकिंग करण्यासाठी प्रवाशांच्या माेठ्या रांगा आहेत. लातूर येथे माेबाईल ॲप रिझर्व्हेशन आणि संगणकावरील ऑनलाईनला प्रतिसाद मिळत आहे. अनेक प्रवासी आता आपल्या स्मार्ट फाेनवरूनच ऑनलाईन बुकिंगचा लाभ घेत आहेत. यातून प्रवाशांची वेळ आणि पैशाची बचत हाेत आहे.
हणमंत चापटे, स्थानकप्रमुख, लातूर