पैशाच्या कारणावरुन एकाला चाकूने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:22 IST2021-08-15T04:22:14+5:302021-08-15T04:22:14+5:30

लातूर शहरातून माेटारसायकलची चाेरी लातूर : शहरातील अंबाजाेगाई राेडवरील एका काॅम्प्लेक्ससमाेर थांबविण्यात आलेली माेटारसायकल अज्ञात चाेरट्यांनी चाेरुन नेल्याची घटना ...

One was stabbed for money | पैशाच्या कारणावरुन एकाला चाकूने मारहाण

पैशाच्या कारणावरुन एकाला चाकूने मारहाण

लातूर शहरातून माेटारसायकलची चाेरी

लातूर : शहरातील अंबाजाेगाई राेडवरील एका काॅम्प्लेक्ससमाेर थांबविण्यात आलेली माेटारसायकल अज्ञात चाेरट्यांनी चाेरुन नेल्याची घटना २९ जुलै राेजी घडली. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी माेहसीन इदरसिंग सय्यद (३१ रा. जाफर नगर, लातूर) यांनी आपल्या ताब्यातील माेटारसायकल एम.एच. २४ ए.इ. ०२३९ अंबाजाेगाई राेडवरील एका काॅम्प्लेक्ससमाेर थांबविली हाेती. ती अज्ञात चाेरट्याने पळविली. याबाबत शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेहेकाॅ गाराेळे करीत आहेत.

क्षुल्लक कारणावरुन मारुन एकाचे दात पाडले

लातूर : क्षुल्लक कारणासह धक्का मारुन एकाला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना उदगीर शहरातील भाजी मार्केट परिसरात घडली. याबाबत उदगीर शहर पाेलीस ठाण्यात एकाविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवार, १३ ऑगस्ट राेजी घडली.

पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी विजय हरिदास बडे (४५, रा. साेमनाथपूर, ता. उदगीर) यांना भाजी मार्केट काॅर्नरला अजहर महेबूब मिरदे (१९ रा. फुलार गल्ली, उदगीर) याने फिर्यादीच्या खांद्याला धक्का मारला. यावेळी फिर्यादीने विचारणा केली असता, तू काेण लागून गेलास म्हणून ताेंडावर मारुन दाेन दात पाडले. शिवाय, खाली पाडून जबर मारहाण केली. त्याचबराेबर जीवे मारण्याची धमकी दिली. यामध्ये माेबाइलचे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी उदगीर येथील भाजी मार्केट परिसरात घडली. याबाबत उदगीर शहर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाेलीस उपनिरीक्षक खेडकर करीत आहेत.

Web Title: One was stabbed for money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.