मोबाइल घेतल्याच्या कारणावरून एकाचा मारहाण करून खून

By हरी मोकाशे | Updated: September 26, 2023 18:10 IST2023-09-26T18:10:07+5:302023-09-26T18:10:18+5:30

चौघा संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात

One was beaten to death for taking a mobile phone | मोबाइल घेतल्याच्या कारणावरून एकाचा मारहाण करून खून

मोबाइल घेतल्याच्या कारणावरून एकाचा मारहाण करून खून

उदगीर (जि. लातूर) : मोबाइल घेतल्याच्या कारणावरून शहरातील बनशेळकी रोडवरील एका ३८ वर्षीय व्यक्तीस मुकामार देऊन खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसांनी चौघांना संशयित आराेपी म्हणून ताब्यात घेतले आहे.

उदगीर ग्रामीण पोलिसांनी सांगितले, शहरातील बनशेळकी रोडवर सुरेश चंदर कांबळे (३८) हा राहतो. त्याच भागातील संशयित आरोपी वहाब मोईनोद्दीन शेख, आदिल खादरी मेराज, महेश नागनाथ मुरगे, जुनेद रहीम शेख यांनी संगनमत केले. सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास मोबाइल घेतल्याच्या कारणावरून सुरेश कांबळे यास बनशेळकी रोडवरील राणीमहल भागात नेले. तिथे त्यास मुकामार देऊन खून केला. 

ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी पंचनामा केला. याप्रकरणी मयताचा भाऊ रमेश चंदर कांबळे (रा. बनशेळकी रोड, उदगीर) यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, वरील चौघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: One was beaten to death for taking a mobile phone