शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

स्वतंत्र ट्रॅक नसल्याने अडथळ्यांची शर्यत; सायकलपटूंच्या चाकांना गती मिळेना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 17:16 IST

शहरात पाच वर्षांच्या बालकांपासून ८० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंतच्या बहुतांश जणांना सायकलिंगचा छंद लागला आहे.

- महेश पाळणेलातूर : आरोग्यासाठी सर्वजण दक्ष राहतात. कोणत्या ना कोणत्या व्यायामाचा छंद जोपासत नागरिक पहाटेपासूनच कसरती करतात. कोरोनापासून तर आरोग्याकडे लक्ष वाढले आहे. यात सायकलिंग अनेकजण प्राधान्य देत असल्याचे आपण पाहतो. सायकलिंगपटूही याकडे करिअर म्हणून पाहू लागले आहेत. मात्र, शहरात स्वतंत्र सायकलिंग ट्रॅक नसल्याने सायकलपटूंच्या चाकांना गती मिळेनाशी झाली आहे.

शहरात पाच वर्षांच्या बालकांपासून ८० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंतच्या बहुतांश जणांना सायकलिंगचा छंद लागला आहे. त्यामुळे शहरातील रिंगरोड व परिसरात सकाळच्या वेळी सायकलिंग करतानाचे चित्र आहे. काही सायकलिंग पटू तर याकडे करिअर म्हणून पाहू लागले आहेत. मात्र, त्यांच्यासाठी स्वतंत्र अशी सायकलिंगसाठी जागा नसल्याने अडचण निर्माण होत आहे. अनेकदा मुख्य रस्त्यावर सायकलिंग करताना अपघाताच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. अनेक खेळांच्या खेळाडूंसाठी व वॉकिंग करणाऱ्यांसाठी क्रीडा संकुल व इतर ठिकाणी मैदानाचा आधार आहे. मात्र, सायकलिंगपटूंना मुख्य रस्त्यावर सायकलिंग करण्याशिवाय वाव नाही.

शहरातील अरुंद रस्ते, अतिक्रमणांमुळे त्यांना मुख्य रस्त्याशिवाय पर्याय नाही. शहराच्या बाहेर त्यांच्यासाठी किमान २ फूट रुंद व २० किमी लांबीचा स्वतंत्र सायकलिंग ट्रॅक असणे आवश्यक आहे. जेणेकरून नवोदित खेळाडूंसह नागरिकांनाही त्याचा फायदा होईल. नांदेडसह पुणे, नागपूर, नाशिक येथे सायकलपटूसाठी स्वतंत्र सायकलिंग ट्रॅक आहे. याच धर्तीवर लातुरातही असा ट्रॅक विकसित व्हावा, अशी अपेक्षा सायकलपटूंची आहे.

सायकलिस्ट क्लबच्या माध्यमातूनही शेकडोजण रस्त्यावर...शहरातील सायकलप्रेमींनी लातूर सायकलिस्ट क्लब सुरू केले आहे. या माध्यमातून दररोज शेकडोजण सायकलिंग करतात. लातूर- तिरुपती, लातूर- पंढरपूर असा प्रवासही ते नेहमीच करतात. यासह काही युवक अधून-मधून दिवसाकाठी २०० किमीपर्यंत सायकलिंगही करतात. यासह टूर डे हंड्रेडच्या माध्यमातून पुणे, सिंहगड, पानशेत, देहू- आळंदी, जेजुरी, सासवड, थेऊर, कात्रज घाटमार्गे खेड शिवापूर पुणे असा प्रवास करतात.

पालकांचीही मानसिकता बदलेल...मुख्य रस्त्यावर मुलांना सायकलिंगसाठी पाठविण्यास पालक धजावत नाहीत. त्यामुळे स्वतंत्र ट्रॅक झाला तर उत्तमच आहे. त्यामुळे नवोदित खेळाडू सायकलिंगकडे वळतील, यासह सायकलिंग पटू म्हणून उदयास येणाऱ्या खेळाडूंनाही सरावासाठी हा ट्रॅक सोयीचा होईल. जेणे करून सायकलिंगची क्रेझ वाढून आरोग्याचेही रक्षण होईल. - संघर्ष शृंगारे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेता सायकलपटू.

टॅग्स :laturलातूरEducationशिक्षणMuncipal Corporationनगर पालिका