रेल्वेची संख्या वाढली; प्रवाशांचा मिळतोय प्रतिसाद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:20 IST2021-07-30T04:20:59+5:302021-07-30T04:20:59+5:30

सध्या सुरू असलेल्या रेल्वे... लातूर-मुंबई बिदर-मुंबई हैदराबाद-हडपसर कोल्हापूर-नागपूर पनवेल-नांदेड कोल्हापूर-धनबाद यशवंतपूर-लातूर रेल्वे सुरू झाल्याने गैरसोय दुर... मध्यंतरी रेल्वे बंद ...

The number of trains increased; Response from passengers! | रेल्वेची संख्या वाढली; प्रवाशांचा मिळतोय प्रतिसाद !

रेल्वेची संख्या वाढली; प्रवाशांचा मिळतोय प्रतिसाद !

सध्या सुरू असलेल्या रेल्वे...

लातूर-मुंबई

बिदर-मुंबई

हैदराबाद-हडपसर

कोल्हापूर-नागपूर

पनवेल-नांदेड

कोल्हापूर-धनबाद

यशवंतपूर-लातूर

रेल्वे सुरू झाल्याने गैरसोय दुर...

मध्यंतरी रेल्वे बंद असल्याने मुंबईला जाण्यासाठी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. आता रेल्वे सुरू झाल्याने गैरसोय दूर झाली आहे. मुंबईला नियमित जाणे-येणे आहे. मात्र, सध्या मुंबईत पावसामुळे जाणे टाळले आहे. ऑनलाईन बुकिंगही सुरू असल्याने प्रवाशांची सोय झाली आहे. - रामेश्वर गवारे

लातूर रेल्वेस्थानकातून कोल्हापूर, बिदर, यशवंतपूर, धनबादला जाण्यासाठी रेल्वे सुरू झाल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. मध्यंतरी रेल्वे बंद असल्याने गैरसोय झाली परंतु आता रेल्वेनेच प्रवास करण्यास प्राधान्य आहे. - बाबासाहेब वाघमारे

ऑनलाईन बुकिंग...

रेल्वे प्रशासनाच्यावतीने रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ऑनलाईन बुकिंग सुरू आहे.

जवळपास ४० टक्के प्रवासी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करीत असल्याचे लातूर रेल्वेस्थानक प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

पॅसेंजर बंदच...

लातूरहून जाणाऱ्या दोन पॅसेंजर अद्याप बंदच आहेत. त्या सुरू करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयातून निर्णय होता. त्यामुळे सद्यस्थितीत ज्या रेल्वे सुरू आहेत. त्यासाठी ऑनलाईन बुकिंग सुरु करण्यात आले आहे. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. - बी.के. तिवारी, रेल्वेस्टेशन प्रबंधक

Web Title: The number of trains increased; Response from passengers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.