हाळी हंडरगुळीत तापाचे रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:20 IST2021-07-28T04:20:59+5:302021-07-28T04:20:59+5:30
हाळी हंडरगुळी : उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी गावात मागील आठवडाभरापासून ताप, अंगदुखी, डोकेदुखी या आजाराचे रुग्ण वाढत असल्याने उपचारासाठी ...

हाळी हंडरगुळीत तापाचे रुग्ण वाढले
हाळी हंडरगुळी : उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी गावात मागील आठवडाभरापासून ताप, अंगदुखी, डोकेदुखी या आजाराचे रुग्ण वाढत असल्याने उपचारासाठी दवाखान्यात गर्दी होत आहे. वातावरणातील बदलामुळे अशा आजारांवर वाढ होत असल्याचे वैद्यकीय विभागाचे म्हणणे आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असल्याने मनात भीतीची पाल चुकचुकत आहे. अशातच सध्या लहान मुलांसह ज्येष्ठांना तापाची कणकण जाणवत असल्याने नागरिक उपचारासाठी गर्दी करत आहेत.
सध्या पावसाळा सुरू झाल्याने वातावरणात बदल झाला आहे. सुरुवातीच्या काळात उकाडा व मागच्या काही दिवसांपासून गारवा असे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे याचा परिणाम, मानवी आरोग्यावर होत आहे. हंडरगुळी प्राथमिक आरोग्य केंद्रात गावासह परिसरातील गावातील नागरिक उपचारासाठी येतात. मे, जून महिन्यात दररोज शंभराच्या खाली असलेली ओपीडी सध्या दिडशेच्या आसपास होत आहे. रविवारी तर २२७ ओपीडी झाल्याचे सांगण्यात आले.
वातावरणातील बदलामुळे आजारात वाढ...
वातावरणातील बदलामुळे व संक्रमणाच्या काळामुळे अशा आजारात वाढ आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य तपासणी करून घ्यावी. स्वच्छता बाळगावी.
- डाॅ. प्रशांत गजाई, वैद्यकीय अधिकारी