आता २०० नागरिकांच्या उपस्थितीत हाेऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:26 IST2021-08-18T04:26:12+5:302021-08-18T04:26:12+5:30
लग्नसमारंभासाठी या आहेत अटी... मंगल कार्यालय : मंगल कार्यालयामध्ये लग्न करण्यासाठी त्या ठिकाणी वऱ्हाडी मंडळी जाण्यापूर्वी पूर्ण परिसर सॅनिटायझर ...

आता २०० नागरिकांच्या उपस्थितीत हाेऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान !
लग्नसमारंभासाठी या आहेत अटी...
मंगल कार्यालय : मंगल कार्यालयामध्ये लग्न करण्यासाठी त्या ठिकाणी वऱ्हाडी मंडळी जाण्यापूर्वी पूर्ण परिसर सॅनिटायझर करून घेणे बंधनकारक आहे. प्रत्येकाने मास्क परिधान करणे, साेशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे.
लाॅन : मंगल कार्यालये आणि लाॅन परिसरासाठी सारखेच नियम लागू करण्यात आले आहे. वऱ्हाडी मंडळी परराज्यांतून येणार असतील तर त्यांची काेराेना चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. त्याचबराेबर वऱ्हाडी मंडळींनी काेराेना लसीकरण केले की नाही, हेही तपासणे गरजेचे आहे.
मंगल कार्यालयात उत्साहाला उधाण...
लग्न व इतर समारंभांना दाेनशे लाेकांची परवानगी दिल्याने समाधान आहे. काैटुंबीक कार्यक्रम उत्साहाने पार पडत आहेत. अनेक जण साखरपुड्यांचे कार्यक्रम घेत आहेत.
- साहेबराव कांबळे, उदगीर
मुहूर्त तीन महिन्यांनी...
लग्नाचे मुहूर्त जवळपास संपले असून, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टाेबर असे तीन महिने विवाह मुहूर्त नाहीत. नाेव्हेंबरमध्ये २०, २१, २९ आणि ३० चारच विवाह मुहूर्त आहेत.
लग्नाचे सर्व मुहूर्त संपल्यानंतर शासनाने नियमांत शिथिलता आणली आहे. सध्याला मुहूर्त असले तरी लग्नासाठी शुभमुहूर्त नाहीत. त्यासाठी आता साखरपुड्याचा कार्यक्रम उरकला जात आहे.
- अमर जाेशी, पंडित
राेजीराेटी सुरू झाली, बँडवालेही जाेरात...
काेराेनामुळे राेजीराेटीचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यातच कार्यक्रमही बंद झाले हाेते. आता नियमांत शिथिलता देण्यात आल्याने साखरपुड्याचे कार्यक्रम हाेत आहेत. यातून राेजीराेटीचा प्रश्न सध्याला थाेडाफार मार्गी लागला आहे. गत दाेन वर्षांपासून उपासमारीची वेळ आली आहे.
- शेषेराव जाधव, लातूर
सध्याला लग्नासाठी शुभमुहूर्त नाहीत. तीन महिने तारखा नसल्याने लग्नसाेहळे बंद आहेत. सध्याला साखरपुड्यासह इतर कार्यक्रमांना पसंती दिली जात आहे. यातून वाजंत्रीवाल्यांचा राेजगार सुरू झाला आहे. वाजंत्रीचा व्यवसाय पूर्णत: बंद पडला हाेता. ताे आता थाेडा-थाेडा सुरू झाला आहे.
- अमर लाेंढे, उदगीर