उपसरपंच पदावर आता इच्छुकांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:33 IST2020-12-14T04:33:11+5:302020-12-14T04:33:11+5:30

... किसान काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी वाडीकर निलंगा : अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या निलंगा तालुकाध्यक्षपदी उमरगा हा. येथील महेश वाडीकर यांची ...

Now the attention of aspirants for the post of Deputy Panch | उपसरपंच पदावर आता इच्छुकांचे लक्ष

उपसरपंच पदावर आता इच्छुकांचे लक्ष

...

किसान काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी वाडीकर

निलंगा : अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या निलंगा तालुकाध्यक्षपदी उमरगा हा. येथील महेश वाडीकर यांची निवड करण्यात आली. मराठवाडा अध्यक्ष ॲड. रवी पाटील यांनी नियुक्तीपत्र दिले. या निवडीबद्दल काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, अभय साळुंके, किसान काँग्रेसचे मराठवाडा सचिव गोविंद शिंगाडे, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, जिल्हा सरचिटणीस अजित निंबाळकर, तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, प्रा. गजेंद्र तरंगे, सरपंच अमाेल बिराजदार, चंद्रप्रकाश सुरवसे आदींनी अभिनंदन केले.

...

निलंग्यात अविनाश रेशमे यांचा सत्कार

निलंगा : शिवसेनेच्या निलंगा तालुकाप्रमुखपदी अविनाश रेशमे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, राष्ट्रवादीचे धम्मानंद काळे, सुग्रीव सूर्यवंशी, महेश मसलगे, मंगेश चव्हाण, सागर पाटील, किरण पाटील, सुरज पाटील, माधव कांबळे आदी उपस्थित होते.

...

गोपीनाथ मुंडे यांना खरोळ्यात अभिवादन

पानगाव : रेणापूर तालुक्यातील खरोळा येथील सेवा सहकारी सोसायटीत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त शनिवारी अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य ओमप्रकाश गोडभरले, पन्नगेश्वरचे संचालक नवनाथ भोसले, चेअरमन सुधाकर काळे, संतोष पिंपळे, चंद्रकांत आदुडे, तात्या आडतराव, सिद्धेश्वर पिंपळे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.

...

माळहिप्परगा येथे अभिवादन कार्यक्रम

जळकोट : तालुक्यातील माळहिप्परगा येथे लोकनेेते गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पवार, माजी सैनिक शिवाजी केंद्रे, सरपंच राजेश केंद्रे, उपसरपंच संपत सोनकांबळे, पोलीस पाटील धोंडिराम राठोड, तंटमुक्ती अध्यक्ष जगदीश केंद्रे, नारायण केंद्रे, चंद्रकांत पवार, गोविंद केंद्रे, बालाजी केंद्रे, धोंडिराम केंद्रे, अनिल केंद्रे, उद्धव केंद्रे, अंकुश केंद्रे, राजीव केंद्रे, संजीव रायेवार, पंडित टोपे, नागेश केंद्रे आदी उपस्थित होते.

Web Title: Now the attention of aspirants for the post of Deputy Panch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.