शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

तळेगावच्या शेतकऱ्यांना आलेल्या नोटीसा वक्फ बोर्डाकडून गेलेल्या नाहीत- अध्यक्ष समीर काजी

By आशपाक पठाण | Updated: December 8, 2024 18:46 IST

याचिकाकर्त्याने वक्फ न्यायाधीकरणात तक्रार केल्याने निघाल्या समन्स

लातूर / अहमदपूर : राज्य शासनाच्या वक्फ न्यायाधिकरणात याचिकाकर्ते पटेल सय्यद इरफान यांच्या अर्जावरून अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथील जवळपास १०३ शेतकरी व महाराष्ट्र शासन यांना ३० मे रोजी नोटिसा बजावण्यात आल्या. एकाचवेळी शंभरावर शेतकऱ्यांना नोटिसा आल्याने अनेकांनी वकिलांमार्फत आपले म्हणणे सादर केले. यावर आता २० डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, तळेगावच्या शेतकऱ्यांना पाठविलेल्या नोटीशीसी वक्फ बोर्डाचा संबंध नसल्याचे रविवारी बाेर्डाने स्पष्ट केले आहे.

तळेगावच्या जमिनीवर महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण औरंगाबादच्या न्यायालयाने याचिका क्र . १७/ २०२४ अन्वये हा दावा केला आहे. त्याचप्रमाणे संबंधित शेतकऱ्यांना ३० मे २०२४ रोजी बजावण्यात आलेल्या नोटिसीमध्ये, वक्फ न्यायाधिकरणात वैयक्तिकरीत्या किंवा प्लीडरद्वारे अपीलाशी संबंधित सर्व भौतिक प्रश्नांची उत्तरे देण्याबाबत समन्स बजावण्यात आले आहे. न्यायाधिकरणास उत्तर देण्यास सक्षम असलेली एखादी व्यक्ती असेल, दाव्याचे उत्तर आणि हजेरीसाठी निश्चित केलेले मुद्दे निकाली काढण्यासाठी, अपीलच्या अंतिम निकालासाठी नियुक्त केले गेले आहे, त्या दिवशी तुम्ही सर्व साक्षीदार आणि कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे, असे नमूद केले. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी वक्फ न्यायाधिकरणाकडे धाव घेतली आहे. अनेकांनी वकिलांमार्फत आपले म्हणणे सादर केले आहे.

तीन पिढ्यांपासून जमीन कसतो...

माझी पाच एकर जमीन आहे. आमच्या तीन पिढ्यांपासून आम्ही ही जमीन कसतो. आमच्याकडे खासरा पानी नक्कल, सात-बारा आदी पुरावे आहेत. २० डिसेंबर रोजी औरंगाबाद वक्फ न्यायाधिकरणाकडे हे पुरावे वकिलांमार्फत सादर करणार आहोत. एकाचवेळी गावातील १०३ शेतकऱ्यांना नोटिसा आल्यामुळे शेतकरी घाबरले आहेत. - तुकाराम कानवटे, शेतकरी, तळेगाव.

शासनाकडून शपथपत्र दाखल केले जाईल...तळेगाव येथील १०३ शेतकऱ्यांच्या जवळपास ३०० एकर जमिन प्रकरणी शेतकऱ्यांना वक्फ न्यायाधीकरणाच्या नोटीसा आल्या आहेत. याची संपूर्ण माहिती घेऊन शासनातर्फे शपथपत्र दाखल करण्यात येणार आहे. -उज्जवला पांगरकर, तहसीलदार, अहमदपूर.

राज्य वक्फ बोर्डाचा संबंध नाही...तळेगाव येथील शेतकऱ्यांना पाठविलेल्या नोटिसा एका व्यक्तीने वक्फ ट्रिबुनल कोर्टात दावा दाखल केल्यानंतर कोर्टाने काढल्या आहेत. त्या नोटीसा वक्फ बोर्डाकडून गेलेल्या नाहीत. आम्ही लातूर जिल्ह्यातील कुठल्याही गावच्या जमीनीवर दावा केलेला नाही. - समीर काजी, अध्यक्ष, वक्फ बोर्ड, महाराष्ट्र राज्य.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी