औश्यात सहा दिवसांपासून निर्जळी; पालिकेच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादीचे भजन आंदोलन
By हरी मोकाशे | Updated: February 25, 2023 17:39 IST2023-02-25T17:39:06+5:302023-02-25T17:39:18+5:30
शहरातील राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयासमोर हे निषेध आंदोलन करण्यात आले.

औश्यात सहा दिवसांपासून निर्जळी; पालिकेच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादीचे भजन आंदोलन
औसा : थकित वीजबिलापोटी दीड महिन्यात तिसऱ्यांदा पाणी पुरवठ्याचा वीजपुरवठा तोडण्यात आला आहे. त्यामुळे शहरात सहा दिवसांपासून निर्जळी आहे. तसेच घंटागाड्या बंद असल्याने शहरातील कचरा व्यवस्थापन कोलडमले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह तत्कालिन सत्ताधाऱ्यांनी शनिवारी भजनांतून प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त करण्यात आला.
शहरातील राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयासमोर हे निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी धरण उशाला, कोरड घशाला, जनतेस वेठीस धरणाऱ्या पालिका प्रशासनाचा धिक्कार असो, अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच भजनातून पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त करण्यात आला. हे आंदोलन राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. अफसर शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलनात माजी नगराध्यक्ष जावेद शेख, मेहराज शेख, किर्ती कांबळे, गोविंद जाधव, वकील इनामदार, अविनाश टिके, ॲड. शिवाजी सावंत, संगमेश्वर उटगे, संतोष औटी, मुकेश तोवर, उमर पंजेशा, राम गुरव, कृष्णा सावळकर, जमीर शेख, गजानन शिंदे, रुपेश दुधनकर, रवि सूर्यवंशी, अमर रेड्डी, इरफान शेख, बासीद शेख, आर्यन डोलारे आदींचा समावेश होता.