चार दिवसापासून सूर्यदर्शन नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:13 IST2021-07-24T04:13:51+5:302021-07-24T04:13:51+5:30
औराद शहाजानी परिसरात यावर्षी पावसाची संततधार सुरू आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात खंड पडला हाेता. त्यानंतर जुलैच्या ५ तारखेपासून ...

चार दिवसापासून सूर्यदर्शन नाही
औराद शहाजानी परिसरात यावर्षी पावसाची संततधार सुरू आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात खंड पडला हाेता. त्यानंतर जुलैच्या ५ तारखेपासून पाऊस सुरू झाला. तो अद्यापही सुरू आहे. मध्यंतरी पाच दिवस जाेरदार पाऊस झाला. त्यानंतर दाेन दिवस उघडीप दिली. त्यानंतर कमी-अधिक पाऊस सुरूच राहिला. चार दिवसापासून सूर्यदर्शन नाही. पावसामुळे पिके पिवळी पडली आहेत. सखल भागात पाणी थांबले आहे. पिकांना सूर्यप्रकाशाची गरज आहे. याशिवाय पिकांची वाढ हाेत नाही. सततच्या पावसाने तूर पीक उंबळून गेले आहे.
सततच्या पावसामुळे तेरणा नदीवरील औराद, तगरखेडा, लिंबाळा, मदनसुरी, किल्लारी, राजेगाव ही सर्व बंधारे भरली आहेत. मांजरा नदीवरील हाेसूर बंधारा भरला आहे. सर्वच बंधाऱ्यांची दारे उघडली असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बडूर येथील लघु साठवण तलाव भरला असून, यात ३.५ दलघमी पाणीसाठा झाला आहे. शिरसी हंगरगा लघु तलावात १.२५ दलघमी पाणीसाठा झाला आहे.