चॉकलेट नको, मला सॅनिटायझर हवे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:17 IST2021-02-08T04:17:42+5:302021-02-08T04:17:42+5:30
लातूर : शाळा-महाविद्यालयांमध्ये आता विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे. गेल्या दहा-बारा महिन्यांपासून शाळा बंद होत्या. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर ...

चॉकलेट नको, मला सॅनिटायझर हवे!
लातूर : शाळा-महाविद्यालयांमध्ये आता विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे. गेल्या दहा-बारा महिन्यांपासून शाळा बंद होत्या. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर शाळा सुरू झाल्या आहेत. उपस्थित विद्यार्थी संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. जनजागृतीमुळे विद्यार्थी शाळेत जाताना चॉकलेट नको मला सॅनिटायझर, मास्क हवे असा हट्ट करीत आहेत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या बॅगमध्ये आता सॅनिटायझरची बाटली दिसत आहे.
जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या १ हजार ९३७ शाळा आहेत. त्यापैकी १ हजार ७२५ शाळा सुरू झाले आहेत. या शाळांच्या पटावर २ लाख १० हजार २०० विद्यार्थ्यांची नोंद आहे. त्यापैकी ७६ हजार ५३० च्या आसपास विद्यार्थी दररोज उपस्थित राहत आहेत. ऑफलाइन किंवा ऑनलाइन हे विद्यार्थ्यांच्या मनावर असल्याने त्यांना पसंतीनुसार ऑफलाइन, ऑनलाइन वर्ग करता येत आहेत. दिवसेंदिवस ऑफलाइन वर्गाला विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत आहे. वीस ते पंचवीस टक्क्यांवरील उपस्थिती चाळीस ते पन्नास टक्क्यांवर पोहोचली आहे. उपस्थित विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता सॅनिटायझर आणि मास्क वापर चांगला असल्याचे दिसून आले. शाळेत येताना पालकांकडे सॅनिटायझरचा हट्ट विद्यार्थी करीत आहेत. शाळेतील शिक्षकांकडून सुरक्षित अंतर, सॅनिटायझर आणि मास्क वापरणे याबाबत जनजागृती केल्याने विद्यार्थी घरी आल्यावरही आपल्या पालकांना सदर माहिती देत आहेत.