‘निवडूंग ते बोधीवृक्ष’ आत्मकथा कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:19 IST2020-12-29T04:19:02+5:302020-12-29T04:19:02+5:30
यावेळी पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले, आत्मकथनाचे शीर्षक अत्यंत कल्पक आणि सुंदर आहे. या शीर्षकावरूनच बनसोडे गुरुजींचे आयुष्य कळून येेते. ...

‘निवडूंग ते बोधीवृक्ष’ आत्मकथा कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारी
यावेळी पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले, आत्मकथनाचे शीर्षक अत्यंत कल्पक आणि सुंदर आहे. या शीर्षकावरूनच बनसोडे गुरुजींचे आयुष्य कळून येेते. ग्रामीण भागात ज्या तत्वनिष्ठ व्यक्ती पहायला मिळतात, त्यापैकी बनसोडे गुरुजी आहेत. राजकारणात पारदर्शक जीवन जगणे अवघड आहे. परंतु, बनसोडे गुरुजी त्याला अपवाद आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी कधीही नियमाला सोडून काही केले नाही. राज्यकर्त्यांना अशी माणसं सापडणं राज्यकर्त्यांचे काम सुलभ करणारे असते. बनसोडे गुरुजींकडे सर्व पदे चालून आली. त्यांनी कधी त्यासाठी धडपड केली नाही. जिल्हा परिषदेच्या परिसरात विकासरत्न विलासराव देशमुख यांचा पूर्णाकृती पुतळा बनसोडे गुरुजी यांच्या प्रयत्नामुळे उभा राहिला. त्यांनी आता समाज प्रबोधनाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. सामाजिक असमतोल कसा दूर करता येईल, याकडे लक्ष द्यावे, असेही पालकमंत्री देशमुख म्हणाले.
यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे यांचेही समयोचित भाषण झाले. अध्यक्षीय समारोप उत्तम कांबळे यांनी केला. प्रास्ताविक डॉ. गौतमी कदम यांनी केले. डॉ. मिलिंद कदम, डॉ. शिवशरण हावळे, डॉ. सतीश कानडे, सहदेव मस्के यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.