केंद्र सरकारच्या विरोधात निलंग्यात जनजागरण आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:14 IST2021-06-27T04:14:25+5:302021-06-27T04:14:25+5:30
ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झालेले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात झालेली ओबीसी जनगणना तत्काळ ...

केंद्र सरकारच्या विरोधात निलंग्यात जनजागरण आंदोलन
ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झालेले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात झालेली ओबीसी जनगणना तत्काळ जाहीर करून ओबीसींचे राजकीय आरक्षण लागू करावे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावून मान्यता घ्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या. पेट्रोल, गॅस, खाद्यतेलाच्या दरात वाढ तसेच शेतकरीविरोधी कायद्यामुळे काळ्या फिती लावून केंद्र सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या.
आंदोलनात अशोकराव पाटील मित्र मंडळाचे अध्यक्ष दयानंद चोपणे, जि.प. सदस्य सुरेंद्र धुमाळ, माजी नगरसेवक अशोक शेटकार, युवक काँग्रेसचे सरचिटणीस अमोल सोनकांबळे, उपाध्यक्ष रमेश मोगरगे, सेवा दलाचे प्रमोद ढेरे, रोहन सुरवसे, सरपंच साहेबराव भोईबार, सरपंच हरिभाऊ बोळे, स्वरूप येळकर, सरपंच लिंबराज जाधव, महेश चिकराळे, गोविंद सूर्यवंशी, माजी सभापती दिलीप हुलसुरे, मुन्ना सुरवसे, उत्तम माने, अजित बोळे, सोमनाथ कदम, अजय कांबळे, नागनाथ घोलप, दादाराव जाधव आदी सहभागी झाले होते.