नवजात अर्भक आढळले मृतावस्थेत, पोलिसांनी अज्ञातावर केला गुन्हा दाखल

By राजकुमार जोंधळे | Updated: April 17, 2023 20:39 IST2023-04-17T20:39:05+5:302023-04-17T20:39:14+5:30

नवजात अर्भकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

Newborn baby found dead, police registers case against unknown at latur | नवजात अर्भक आढळले मृतावस्थेत, पोलिसांनी अज्ञातावर केला गुन्हा दाखल

नवजात अर्भक आढळले मृतावस्थेत, पोलिसांनी अज्ञातावर केला गुन्हा दाखल

लातूर : नवजात अर्भक मृतावस्थेत आढळल्याची घटना लातूर शहरातील गावभागात सिद्धेश्वर चाैक परिसरात साेमवारी सकाळी घडली. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातुरातील गावभागात सिद्धेश्वर चाैक परिसरात रस्त्यालगत भंगारचे दुकान आहे. या दुकानानजीक एक दिवसाचे नवजात अर्भक मृतावस्थेत आढळून आले. याबाबतची माहिती स्थानिक नागरिकाने गांधी चाैक पाेलिस ठाण्याला दिली. पाेलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकाेडे, सहायक पाेलिस निरीक्षक प्रशांत लाेंढे, पाेलिस कर्मचारी हरीराम साेनकांबळे यांनी घटनास्थळी तातडीने भेट देत पंचनामा केला. नवजात अर्भकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सात ते आठ महिन्यांचा हा गर्भ असवा, असा पाेलिसांनी अंदाज व्यक्त केला. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास गांधी चाैक पाेलिस करत आहेत.

Web Title: Newborn baby found dead, police registers case against unknown at latur