शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच दणका; ५५ मद्यपी चालकांवर गुन्हे दाखल

By राजकुमार जोंधळे | Updated: January 1, 2025 20:12 IST

नाकाबंदी : लातूर जिल्ह्यात ४६१ चालकांविराेधात कारवाई...

राजकुमार जाेंधळे / लातूर : नववर्षाच्या पूर्वसंध्येला पाेलिसांनी केलेल्या तपासणीमध्ये ५५ मद्यपी चालक आढळून आले आहेत. त्यांच्याविराेधात त्या-त्या पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भरधाव, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या तब्बल ४६१ वाहनचालकांवर लातूर पाेलिसांनी कारवाई केली असून, तीन लाख ४१ हजारांचा दंड वसूल केला आहे.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्या चालकांविराेधात लातूर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत केलेल्या कारवाईमध्ये ५५ मद्यपी वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्याचबराेबर अतिवेगामध्ये वाहन चालविणे, भररस्त्यावर वाहन थांबविणे, रहदारीला अडथळा करणे, हायगय आणि बेदरकारपणे वाहन चालवून इतरांच्या जीविताला धाेका निर्माण हाेईल, स्वत:चा जीव धोक्यात घालणाऱ्या एकूण ४६१ चालकांवर पाेलिसांनी थेट गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याकडून ३ लाख ४१ हजार २०० रुपयांचा दंडही वसूल केला आहे.

सार्वजनिक ठिकाणीमद्यपींकडून शांतता भंग...नववर्षाच्या स्वागतासाठी काहीजण सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करून शांतता भंग केल्याचे आढळून आले. मद्यपींकडून होणारे अपघात, त्यात मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शिवाय, मद्य प्रशासन करून वाहन चालविणाऱ्यांकडून नियमांचा सर्रासपणे भंग केला जात आहे. परिणामी, मद्यपींकडून वाहन चालविणाऱ्यांविरोधात लातूर पोलिसांनी कारवाई केली आहे.

लातूर जिल्ह्यात २३ पाेलिसठाण्यांच्या हद्दीमध्ये तपासणी...जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करून दुचाकी, चारचाकींसह इतर वाहनांची तपासणी करण्यात आली. वाहनचालकांनी मद्यप्राशन केल्याचे आढळल्याने त्यांच्याविराेधात पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मद्य प्रशान करून वाहन चालविणे, स्वतःसह इतरांच्या जीविताला धाेका पाेहोचविणे, वाहतुकीचे नियम माेडणाऱ्यांवर पाेलिसांनी कारवाई केली आहे.

१,१२७ पाेलिस अधिकारीअन् कर्मचारी बंदाेबस्तावर...लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध २३ पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत मंगळवारी रात्री तगडा बंदाेबस्त तैनात करण्यात आला हाेता. जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे, अप्पर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे यांच्यासह १०२ पाेलिस अधिकारी, ४२५ पाेलिस कर्मचारी, ६०० हाेमगार्डस् बंदाेबस्तावर हाेते. मंगळवारी दुपारी ४ वाजल्यापासून बुधवारी पहाटे ६ वाजेपर्यंत हा बंदाेबस्त हाेता.

टॅग्स :laturलातूर