शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

सीमावर्ती भागातून लातुरात नवीन बाजरीची आवक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:03 PM

बाजारगप्पा : खरिपातील बाजरीची लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत अल्प प्रमाणात आवक सुरू झाली आहे़

- हरी मोकाशे (लातूर)

खरिपातील बाजरीची लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत अल्प प्रमाणात आवक सुरू झाली आहे़ सर्वसाधारण दर १७०० रुपये मिळत आहे़ दरम्यान, खरेदीदारांकडून अडत्यांना वेळेवर पैसे मिळत नसल्याने शनिवारी अडत्यांनी सोयाबीनचा सौदा पुकारण्यावर बहिष्कार टाकला होता़ त्यामुळे एक दिवस सौदा निघू शकला नाही़ यंदाच्या पावसाळ्यातील अत्यल्प पर्जन्यमानामुळे शेती उत्पादनात जवळपास ७० टक्क्यांनी घट झाली आहे़

परिणामी, आॅक्टोबरपासूनच लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक निम्म्याने होत आहे़ दरवर्षी डिसेंबरमध्ये होणाऱ्या आवकच्या तुलनेत सध्याची आवक ही निम्म्यापेक्षा कमी झाली आहे़ सध्या खरीप हंगामातील बाजरीची जिल्ह्याबरोबरच सीमावर्ती भागातून आवक सुरूझाली असून, त्यास कमाल दर १८०३, किमान दर १६०२ तर सर्वसाधारण भाव १७०० रुपये मिळत आहे़

गत आठवड्याच्या तुलनेत सध्या तुरीची आवक स्थिर असून ती ६६२ क्विं़ आहे़ कमाल दरात ३४ रुपयांनी वाढ झाली आहे़ मात्र, सर्वसाधारण दरात २१० रुपयांनी वाढ झाली आहे़ खरिपातील तुरीचा खराटा झाल्याने आगामी काळात आणखीन तुरीच्या दरात वाढ होईल, असे बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे़ त्याचबरोबर पिवळी रबी ज्वारीची आवक २५० क्विं़ होत असून, कमाल दर ४६७१ रुपयांपर्यंत पोहोचला आहे़ सर्वसाधारण भाव ४३०० रुपये मिळत असून किमान भाव ४ हजार रुपये राहिला आहे़ 

महिनाभरापासून सोयाबीनची आवक स्थिर राहण्याबरोबर दरही स्थिर आहे़ खरेदीदारांकडून अडत्यांना वेळेवर पैसे दिले जात नाहीत़ त्यामुळे आम्ही सोयाबीनच्या सौद्यात सहभागी होणार नाही, असा पावित्रा घेत खरेदीदारांनी शनिवारी सोयाबीनच्या सौद्यावर बहिष्कार टाकला होता़ त्यामुळे दिवसभर सौदा निघाला नाही़ अखेर अडते आणि खरेदीदारांत तडजोड होऊन सोमवारी सोयाबीनचा सौदा पूर्ववत झाला़ कमाल दर ३४४१ रुपये प्रतिक्विंटल मिळाला आहे़ गत आठवड्याच्या तुलनेत गव्हाची आवक निम्म्यावर आली असून २५३ क्विंटल होत आहे़ कमाल दरात ३०० रुपयांनी वाढ झाली असून सर्वसाधारण दर २५०० असा स्थिर राहिला आहे़

सध्या लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण शेतमालाची १८ हजार ८५६ क्विंटल होत आहे़ हायब्रीड ज्वारी- १३५०, रबी ज्वारी- २६००, पिवळी ज्वारी- ४३००, मका- १४५०, हरभरा- ४३२०, मूग- ५१००, करडई- ४१५०, तीळ- ११५००, गुळ- २६९०, धने- ४५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे़ 

नाफेडच्या खरेदी केंद्रावर केवळ २६९ शेतकऱ्यांचा ९८५१ क्विंटल मूग खरेदी झाला आहे़ तसेच उडिदासाठी २६८६ शेतकऱ्यांची नोंदणी असून, २३४ शेतकऱ्यांची ११४४ क्विंटल खरेदी झाली आहे़ सोयाबीन विक्रीसाठी ७७१५ शेतकऱ्यांची नोंदणी झाली असली तरी प्रत्यक्षात १२ शेतकऱ्यांची ११३ क्विंटल खरेदी झाली आहे़ खुल्या बाजारात जास्त भाव मिळत असल्याने शेतकरी तिकडे वळत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी