शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

NEET Exam Paper Leak: उकळलेले पैसे गेले कुणीकडे..? बँक व्यवहाराचा ताळेबंद जुळेना !

By राजकुमार जोंधळे | Updated: July 13, 2024 19:58 IST

NEET Exam Paper Leak: गंगाधरची सीबीआयकडून दिवसभर चाैकशी...

लातूर : ‘नीट’मध्ये (नॅशनल एलिजिबिलिटी एंटरन्स टेस्ट) गुणवाढीचे आमिष दाखवून विद्यार्थी-पालकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी सीबीआय काेठडीत असलेला म्हाेरक्या गंगाधरची दिवसभर चाैकशी केली जात आहे. झालेल्या व्यवहाराचा ताळेबंद मात्र जुळता जुळत नसल्याचे समाेर आले आहे. रेकार्डनुसार सात लाखांवर व्यवहार झाल्याचे समाेर आले आहे. मात्र, यात लाखाे रुपयांची उलाढाल झाल्याचा संशय सीबीआयला आहे.

आंध्र प्रदेशातील हिंदूपुरम (जि. सत्यसाई) येथील मुळचा असलेल्या एन. गंगाधरअप्पा नंजुडअप्पा याने आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात एजंटाची नेमणूक केली असून, त्या माध्यमातून शेकडाे पालकांना गळाला लावले. गुण वाढीचे आमिष दाखवून विविध राज्यातील एजंटांनी लाखाे रुपये उकळल्याचे चाैकशीत समाेर आले. लातुरातील आराेपीसाेबत सात लाखांचा व्यवहार झाल्याचे उघड झाले. गत चार दिवसांपासून सीबीआयने बॅक व्यवहार व इतर संशयास्पद व्यवहाराचा ‘ताळमेळ’ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्याप या व्यवहाराचा ताळेबंद जुळता जुळत नसल्याचे समाेर आले आहे. आराेपींनी माेठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार केल्याचा संशय सीबीआयच्या अधिकाऱ्यांना आहे.

हिसका दाखविला की वाढताे बीपी; २०२२ मध्ये झाली ह्रदय शस्त्रक्रिया...सीबीआय काेठडीतील गंगाधरला हिसका दाखविला की, बीपी वाढत आहे. अचानक बीपी वाढल्याने त्याला लातुरातील शासकीय रुग्णालयात दाेनदा उपचारासाठी दाखल करावे लागले. २०२२ मध्ये त्याची हृदय शस्त्रक्रिया झाल्याचे त्याच्या वकिलाने न्यायालयात सांगितले.

गुणवाढीसाठी पैसे देणारे 'कायद्या'च्या कचाट्यात..?मुलाची पात्रता नसताना एजंटाच्या माध्यमातून पैसे देणाऱ्या पालकांचा पाेलिस, सीबीआयकडून जबाब नाेंदविला जात आहेत. पैसे देणाऱ्या पालक-विद्यार्थ्यांची यादी ३२ वर पाेहचली. यात पैसे देणारे अन् घेणारे दाेघेही दाेषी असून, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी आराेपीच्या वकिलाने न्यायालयाकडे केली.

लातुरातील पाणी पचेना;कोठडीत प्रतिसाद देईना...बंगळरु येथून ६ जुलैराेजी गंगाधरला लातुरातील सीबीआयने ताब्यात घेतले. दरम्यान, त्याला ८ जुलैराेजी रात्री लातुरात आणण्यात आले. मंगळवारी न्यायालयात हजर केले. दाेन दिवसाची काेठडी मिळाली. मात्र, गंगाधरची प्रकृती बिघडली. काेठडीत गंगाधरला ‘लातूरचे पाणी’ पचत नसल्याने ताे चाैकशीला प्रतिसाद देत नाही.

गंगाधर-इरण्णाची समोरासमोर चौकशी...नीट प्रकरणात पसार झालेला इरण्णा काेनगलवार अद्याप सीबीआयच्या हाती लागला नाही. यातील दाेघा शिक्षकांची चाैकशी केली असून, गंगाधारची चाैकशी सुरु आहे. मात्र, मध्यस्थ म्हणून समाेर आलेल्या इरण्णा व म्हाेरक्या गंगाधारची समाेरासमाेर चाैकशी केली जाणार आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी सीबीआयने स्वत: लातूर न्यायालयात अर्ज केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीneet exam paper leakनीट परीक्षा पेपर लीकlaturलातूर