प्रदूषणमुक्ती, आर्थिक उन्नतीसाठी जैव इंधन निर्मितीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:14 IST2021-07-16T04:14:58+5:302021-07-16T04:14:58+5:30
येथील शेतक-यांसाठी जैव इंधन निर्मिती, सेंद्रीय शेती मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी किशोर राठोड, कृषी उद्यान पंडित राजकुमार ...

प्रदूषणमुक्ती, आर्थिक उन्नतीसाठी जैव इंधन निर्मितीची गरज
येथील शेतक-यांसाठी जैव इंधन निर्मिती, सेंद्रीय शेती मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी किशोर राठोड, कृषी उद्यान पंडित राजकुमार दाडगे, माधवराव चव्हाण, प्रगतशील शेतकरी भास्करराव खाडप, पानगावचे सरपंच सुकेश भंडारे, प्रशांत शेट्टे, अंकुश चव्हाण, बालासाहेब चव्हाण, नितीन शेट्टे, संदीप राठोड, सूरज बाजुळगे, मंगेश प्रधान, लहू चव्हाण, हिरालाल चव्हाण यांची उपस्थिती होती.
यावेळी किशोर राठोड म्हणाले, शेतक-यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडविण्याबरोबर प्रदूषणमुक्त देश निर्माण करण्यासाठी जैव इंधन निर्मिती प्रकल्पाची गरज आहे. याप्रसंगी गावसाने म्हणाले, देश धान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला आहे. आता धान्याऐवजी शेतकऱ्यांनी इंधन निर्मितीसाठी लागणाऱ्या पिकांची लागवड करावी. त्यातून अधिक उत्पादन मिळेल. तसेच जनावरांना चारा व सेंद्रीय खतही उपलब्ध होणार आहे. प्रास्ताविक बालासाहेब चव्हाण, सूत्रसंचालन सुरेश बाजुळगे यांनी केले. आभार अंकुश चव्हाण यांनी मानले.
दाडगे यांच्या शेतीची पाहणी...
राजकुमार दाडगे यांनी कमी पाण्यावर शेतात विविध फळबागा, भाजीपाला व द्राक्ष लागवडीचे यशस्वी प्रयोग केले आहेत. सध्या त्यांनी तीन एकरावर ड्रॅगन फ्रूट, शेवगा, चंदन, विविध रोपे व अनेक प्रकारच्या बांबूची लागवड करून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले आहे. त्याचीही पाहणी यावेळी करण्यात आली.