राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी सामान्यांच्या प्रश्नांबाबत जागृत राहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:14 IST2021-06-27T04:14:27+5:302021-06-27T04:14:27+5:30
उदगीर येथील छत्रपती शाहू महाराज सैनिकी शाळेत आयोजित राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय मंत्री ...

राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी सामान्यांच्या प्रश्नांबाबत जागृत राहावे
उदगीर येथील छत्रपती शाहू महाराज सैनिकी शाळेत आयोजित राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत ते बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हाध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील, मराठवाडा संपर्कप्रमुख जयसिंगराव गायकवाड, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, पं.स. सभापती प्रा. शिवाजीराव मुळे, शहराध्यक्ष शेख समीर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, औश्याचे नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख आदी उपस्थित होते.
यावेळी जयंत पाटील म्हणाले, उदगीरच्या मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास ठेवून संजय बनसोडे यांना निवडून दिले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बनसोडे यांना मंत्री केले. कोरोनाकाळातही संजय बनसोडे यांनी मतदारसंघासाठी भरपूर निधी आणला. पुढेही ते उदगीर व जळकोट तालुक्याच्या विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आता यापुढे पक्षबांधणीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी वेळ द्यावा, असे आवाहन केले.
यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीत आघाडी धर्म म्हणून सत्तेतील तिन्ही पक्षांना सोबत घेऊन निवडणुका लढविण्याचा मानस आहे. जर कोणत्या पक्षाची एकट्याने निवडणूक लढविण्याची इच्छा असेल तर आपणही तयारीत असावे लागणार आहे. माझी निवडणूक झाली असून आगामी निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या असल्यामुळे मी कार्यकर्त्यांसोबत नेहमी राहणार असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक प्रा. श्याम डावळे यांनी केले. आभार प्रा. प्रवीण भोळे यांनी मानले.