नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST2021-07-20T04:15:05+5:302021-07-20T04:15:05+5:30
रेणापूर : रेणापूर नगर पंचायत निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रेणापूरचे शहराध्यक्ष बालाजी कदम यांच्यासोबत ...

नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची बैठक
रेणापूर : रेणापूर नगर पंचायत निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रेणापूरचे शहराध्यक्ष बालाजी कदम यांच्यासोबत बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे दोन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर आले होते. निवडणुका व इतर विविध विषयांवर पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या त्यांनी बैठका घेतल्या. या दौऱ्यात रेणापूर शहर राष्ट्रवादीची बैठक झाली. यावेळी शहराध्यक्ष बालाजी कदम यांनी शहरासह तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या विविध अडचणींसंदर्भात चर्चा केली. पक्षाच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडून कार्यकर्त्यांना बळ देऊन पक्ष संघटना वाढविण्यासाठी मदत करावी, अशी मागणी केली.
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शहरासह तालुक्यातील कार्यकर्त्यांना पक्ष संघटना वाढविण्यासाठी व त्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. पक्षवाढीसाठी मार्गदर्शन करुन जोमाने काम करावे, अशीही सूचना केली. यावेळी प्रदेश सरचिटणीस आशाताई भिसे, ग्रामीण विधानसभा अध्यक्ष व्यंकट पाटील, प्रमोद जाधव, सूर्यकांत चव्हाण, धनंजय चव्हाण, पाशा फरीद, चंद्रकांत गिरी, श्याम काळे, रमेश कुराडे, इस्माईल शेख, वामन पाटील, श्रीमंत काळे, सादिक शेख, गणेश कुराडे, आदी उपस्थित होते.