राष्ट्रवादी काँग्रेसची शहर कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:37 IST2021-02-21T04:37:02+5:302021-02-21T04:37:02+5:30

राष्ट्रवादी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष व्यकंट पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. ...

NCP announces city executive | राष्ट्रवादी काँग्रेसची शहर कार्यकारिणी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसची शहर कार्यकारिणी जाहीर

राष्ट्रवादी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष व्यकंट पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा. अकुंश नाडे, माजी जिल्हा कार्याध्यक्ष बबन भोसले, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, शहराध्यक्ष उत्तम चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद जाधव, अशोक शेळके, डॉ. लक्ष्मण मोहाळे, बापु पवार यांची उपस्थिती होती.

या बैठकीत शहर कार्यकारिणीसंदर्भात चर्चा होऊन शहराध्यक्ष बालाजी कदम यांनी कार्यकारिणी जाहीर केली. यात शहर कार्याध्यक्ष म्हणून पाशा फरीद, उपाध्यक्ष शाम काळे, चंद्रकांत गिरी, अशोक निलंगेकर, सरचिटणीस विकास बंजारा, गणेश कुऱ्हाडे, साजिद सय्यद, सहसचिव अनिकेत पांचाळ, बालाजी खोबरे, श्रीकांत कुरे, संघटक इम्रान शेख, नंदू राऊत, कोषाध्यक्ष रमाकांत कुऱ्हाडे, महादेव भांबरे, सदस्य इस्माईल शेख, यांचा समावेश आहे. नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

Web Title: NCP announces city executive