दयानंद महाविद्यालयात एनसीसी वार्षिक प्रशिक्षण शिबीर; कॅडेट्सचा उत्स्फूर्त सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:19 IST2021-02-10T04:19:24+5:302021-02-10T04:19:24+5:30
लातूर : राष्ट्र उभारणीमध्ये एनसीसीचे योगदान आहे, असे प्रतिपादन ५३ महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल सुनील अब्राहम यांनी ...

दयानंद महाविद्यालयात एनसीसी वार्षिक प्रशिक्षण शिबीर; कॅडेट्सचा उत्स्फूर्त सहभाग
लातूर : राष्ट्र उभारणीमध्ये एनसीसीचे योगदान आहे, असे प्रतिपादन ५३ महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल सुनील अब्राहम यांनी येथे केले.
दयानंद महाविद्यालयात एनसीसीच्या वार्षिक कार्यक्रमसंगी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डाॅ. जयप्रकाश दरगड, डाॅ. श्रीराम सोळंके, डाॅ. दिलीप नागरगोजे यांची उपस्थिती होती. या शिबिरात विद्यार्थ्यांना ड्रील, शस्त्र प्रशिक्षण, मॅथ रीडिंग, ग्राऊंड आर्टिकल्स याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
शिबिराच्या यशस्वितेसाठी कॅप्टन विजयेंद्र चौधरी, लेफ्टनंट विवेक झंपले, डाॅ. बालाजी कांबळे, सुभेदार मेजर दीपककुमार, सुभेदार सत्यवान जाधव, समशोद्दीन शेख, हवालदार राकेशकुमार परिश्रम घेत आहेत. सूत्रसंचालन कॅडेट मयुरी काळे, ऋतुजा म्हेत्रे यांनी, तर प्रास्ताविक कॅप्टन विजयेंद्र चौधरी यांनी केले. तर आभार लेफ्टनंट विवेक झांपले यांनी मानले.
राष्ट्र बांधणीमध्ये युवकांनी सक्रियतेने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी ऑफिसर कर्नल देवेश बहुखंडी यांनी केले. यावेळी कॅडेट्सची मोठी उपस्थिती होती.