‘आंतरभारती’तर्फे राष्ट्रीय कविसंमेलन, देशभरातून ५० कवींचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:21 IST2021-07-29T04:21:17+5:302021-07-29T04:21:17+5:30
विदर्भातील कवी डॉ. किशोर बळी यांनी कविसंमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी डॉ. मनीषा यादव, डॉ. मीना गावंडे, डॉ. प्रतिभा जाधव, ...

‘आंतरभारती’तर्फे राष्ट्रीय कविसंमेलन, देशभरातून ५० कवींचा सहभाग
विदर्भातील कवी डॉ. किशोर बळी यांनी कविसंमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी डॉ. मनीषा यादव, डॉ. मीना गावंडे, डॉ. प्रतिभा जाधव, डॉ. डी. एस. कोरे, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर, ॲड. रामचंद्रराव बागल, डॉ. संतोष ठाकरे, कंवलजित धिंडसा, अमर हबीब यांनी विविध सत्रांत मार्गदर्शन केले. राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य सदाविजय आर्य यांच्या मार्गदर्शनाने समारोप करण्यात आला. यासाठी मनीषा यादव, बबनराव कानकिरड, सुधाकर गौरखेडे, मीना गावंडे, दत्ता वालेकर, संजयकुमार माचेवार यांनी पुढाकार घेतला.
कविसंमेलनात दीपाली भेंडे, शरयू गायकवाड, नागसेन कांबळे, बालिका बरगळ, एम. टी. गायकवाड, चंद्रिका पाडगावकर, रेणुका फळदेसाई, देविदास पांचाळ, डॉ. गायत्री मुलंगे, दिलीप धामणे, सुरेखा धूत, आरती मलशेटवार, वेदा थळी, शुभदा सरोदे, संजीवनी कानसकर, सविता कुरुंदवाडे, रोहिणी पांडे, रामराव पाटेखेडे, आर्या पाटेखेडे, प्रा. मुकेश सरदार, सुप्रिया चंद्रशेखर केळकर, श्रेयश्री किल्लेदार, पूर्वा केळकर, नागनाथ बडे, आनंद कोठडिया, स्वाती देशमुख, श्रेया यादव, इंद्रायणी किल्लेदार, दत्ता वालेकर, मिलिंद इंगळे, सुरेखा गावकर, सतीश जाधव, अद्वया आपटे, सुवर्णा जाधव, ज्योत्स्ना गोवेकर, शोभा पाडगावकर, उज्ज्वला देवसरकर, सुनीता इंगळे, रुषाली सामंत, मनीषा दलाल, प्रज्ञाराज्ञी कुलकर्णी, विजय विल्हेकर, उमेशभाऊ अलोणे, दीपलक्ष्मी मोघे, चारूता जोशी-कुलकर्णी, सुधाकर गौरखेडे, सुभाष शास्त्री, आदींनी सहभाग घेतला.