माझं लातूर परिवाराच्या नेत्र तपासणी शिबिरास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:26 IST2021-09-10T04:26:52+5:302021-09-10T04:26:52+5:30

माझं लातूर परिवाराच्यावतीने शहरातील शिवछत्रपती ग्रंथालय येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माझं लातूर सदस्यांकडून तपासणी पूर्व ...

My response to the Latur family's eye check-up camp | माझं लातूर परिवाराच्या नेत्र तपासणी शिबिरास प्रतिसाद

माझं लातूर परिवाराच्या नेत्र तपासणी शिबिरास प्रतिसाद

माझं लातूर परिवाराच्यावतीने शहरातील शिवछत्रपती ग्रंथालय येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माझं लातूर सदस्यांकडून तपासणी पूर्व नोंदणी करण्यात आली होती. यात ५५० रुग्णांनी नोंदणी केली होती. यावेळी ३११ जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. यात १९७ जणांना चष्मा तर ८३ जणांना मोतीबिंदू असल्याचे समोर आले. शिबिरातील १९७ नागरिकांना माझं लातूरच्यावतीने मोफत चष्मा वितरण करण्यात येणार आहे. या सर्व रुग्णांवर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी अनेकांची नेत्र तपासणी मोफत करण्यात आली. नंबर असलेल्या रुग्णांना मोफत चष्मा वितरण करण्याचे नियोजन माझं लातूरच्यावतीने करण्यात आले असून, मोतीबिंदूच्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी माझं लातूर परिवाराचे सतीश तांदळे, अभय मिरजकर, प्रमोद गुडे, दीपरत्न निलंगेकर, ॲड. प्रदीप मोरे, डॉ. सितम सोनवणे, संजय स्वामी, तम्मा पावले, काशिनाथअप्पा बळवंते, राहुल मातोळकर, राजेश तांदळे, गोपाळ झंवर, मोहम्मद जफर, युवराज कांबळे, रत्नाकर निलंगेकर, विनोद कांबळे, आशा आयाचीत, सचिन अंकुलगे, सुनील गवळी, श्रीराम जाधव, उमेश कांबळे, शोभा कोंडेकर, मासूम खान, किशोर जैन, इम्रान नाईकवाडे आदींनी पुढाकार घेतला होता.

Web Title: My response to the Latur family's eye check-up camp