मुरुडमध्ये डीसीसी बँक फोडून १७ लाख पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 18:04 IST2018-07-09T18:03:16+5:302018-07-09T18:04:28+5:30
शहराच्या मध्यवस्तीतील लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची तिजोरी गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील १७ लाख १३ हजार ३९० रुपये चोरट्यांनी पळविल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

मुरुडमध्ये डीसीसी बँक फोडून १७ लाख पळविले
मुरुड ( लातूर) : शहराच्या मध्यवस्तीतील लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची तिजोरी गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील १७ लाख १३ हजार ३९० रुपये चोरट्यांनी पळविल्याची घटना आज सकाळी (दि. ९ ) उघडकीस आली. याप्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला रविवारी सुट्टी असल्याने नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी कर्मचाऱ्यांनी येथील बँकेची शाखा उघडली़ तेव्हा बँकेत चोरी झाल्याचे निदर्शनास आले. बँकेच्या छतावर जाण्यासाठी पायऱ्याच्या वळणावर असलेल्या खिडकीचे गज चोरट्यांनी तोडून बँकेमध्ये प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी गॅस सिलेंडर, कटर गॅल्बनाईज पत्र्यांचे तुकडे असे सर्व साहित्य चोरट्यांनी आणले होते. यानंतर त्यांनी तिजोरीचा मुख्य भाग गॅस कटरने कापून त्यातील १७ लाख १३ हजार ३९० रुपये पळविले.
याप्रकरणी व्यवस्थापक संगिता रामचंद्र माळी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुध्द मुरुड पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़