जेवणाच्या आमंत्रणावरून तरूणाचा खून, लातुरातील घटना : १९ जणांवर गुन्हा दाखल
By आशपाक पठाण | Updated: May 9, 2023 20:28 IST2023-05-09T20:27:59+5:302023-05-09T20:28:32+5:30
लातूर : जेवणाचे आमंत्रण सांगण्याचे कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करून एका तरूणाचा खून करण्यात आल्याची घटना लातूर शहरातील ...

जेवणाच्या आमंत्रणावरून तरूणाचा खून, लातुरातील घटना : १९ जणांवर गुन्हा दाखल
लातूर : जेवणाचे आमंत्रण सांगण्याचे कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करून एका तरूणाचा खून करण्यात आल्याची घटना लातूर शहरातील महाराणा प्रतापनगर भागात ८ मे रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी मयताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात १९ जणांवर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, फिर्यादीचे पती हरजीतसिंग सिसपालसिंग टाक (वय ३५, रा. म्हाडा कॉलनी, लातूर) यांना जेवणाचे आमंत्रण-सांगण्याचे कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमवून हत्यार व काट्यासह शिवीगाळ करून चाकूने, काठीने, विटाने व दगडाने मारहाण करण्यात आल्याने मृत्यू झाला अशी तक्रार मयताची पत्नी नीताकौर हरजितसिंग टाक यांनी दिली आहे.
या तक्रारीवरून सद्दाम मुस्ताक फारूकी, अंजुम सद्दाम फारूकी, इब्राहीम ऊर्फ मुन्ना निसार शेख, पाशा निसार शेख, दयानंद नारायण कांबळे (सर्व रा. म्हाडा कॉलनी), गैबीसाब दगडू शेख, युनूस गुलाब शेख, मोहीन अकबर चौधरी,महेबुब इस्माईल शेख, सलीम चाँदपाशा शेख, इम्रान महेबूब शेख, असलम दगडू शेख, जावेद अब्दुलमजीद सय्यद, अरबाज महेबूब शेख, बबलू महेबूब शेख, शोएब सलीम शेख, हलीम ऊर्फ अमन शेख, प्रवीण प्रताप चोथवे, सोहेल युनूस पठाण यांच्यावर कलम ३०२, ४५२, १४३,१४४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक आर. एच. केदार करीत आहेत.